Homeकोंकण - ठाणेसिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय मान्य करायला हवं,काही लोक म्हणतील मीच बांधला...

सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय मान्य करायला हवं,काही लोक म्हणतील मीच बांधला असं म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नारायण राणेंना जोरदार टोला लगावला.

(सिंधुदुर्ग;-प्रतिनिधी):-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दोघे एकाच मंचावर आज उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. सिंधुदुर्गचा विकास मीच केला आहे हे जनतेला माहित आहे असं नारायण राणे म्हणाले होते त्याला उद्धव ठाकरेंनी खुमासदार शैलीत उत्तर दिलं आहे. सिंधुदुर्गाचा किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय हे मान्य करू.. कुणीतरी म्हणेल मीच बांधला असं म्हणत त्यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.

एक काळ होता की मी एरियल फोटोग्राफी करत असे. त्यावेळी मी गड किल्ल्यांचे फोटो काढले होते. आता मला कुणीतरी ही माहिती द्या… सिंधुदुर्गचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे हे मान्य करू, कुणीतरी म्हणेल की मीच बांधला. असं म्हणत त्यांनी नारायण राणेंना जोरदा टोला लगावला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात कोकणाच्या विकासाचे शिल्पकार आपणच असल्याचा दावा केला होता. साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही, असे नारायण राणेंनी म्हटले होते.

या टीकेला उद्धव ठाकरे यांनीही खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले. मी एरियल फोटोग्राफी करत होतो. महाराजांचे किल्ले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला.तुमच्या कॉलेजसाठी फोन केलात तेव्हा दुसऱ्या क्षणाला फाईलवर सही केली’

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मी विकासाच्या कामात पक्षभेद आणत नसल्याचे ठासून सांगितले. नारायण राणे यांना आठवत नसेल, पण तुमच्या महाविद्यालयाच्या वेळी तुम्ही मातोश्रीवर फोन केला होतात तेव्हा दुसऱ्या क्षणाला मी फाईलवर सही केली होती. कारण, हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या, जनतेच्या भल्यासाठी होते, असे उद्धव यांनी सांगितले.

नारायण राणे यांनी आपल्या भाषणात, ‘बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी राणेंची चांगलीच हजेरी घेतली. नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोलं. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

लघू का असेना सुक्ष्म का असेना पण तुम्हाला मोठं खातं दिलंय’आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.