Homeकोंकण - ठाणेउद्धवजी, हे मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं, सिंधुदुर्गाच्या विकासाचा विचार केला.- नारायण...

उद्धवजी, हे मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं, सिंधुदुर्गाच्या विकासाचा विचार केला.- नारायण राणे

सिंधुदुर्ग:- प्रतिनिधी.

बहुचर्चित सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं ते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे. राणेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘मंचावर उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे’ असं म्हटलं. पुढे मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात एक शब्द बोलले, असं गुपितही राणेंनी सांगितलं.

व्यासपीठावर येण्यापूर्वी मला मुख्यमंत्री भेटले. काहीतर कानाजवळ बोलले. मला एक शब्द ऐकू आला… असो…, असं नारायण राणे म्हणाले. पण तो एक शब्द कोणता, हे मात्र नारायण राणे यांनी सांगितलं नाही. त्यामुळे राणेंच्या कानात मुख्यमंत्री नेमका कोणता शब्द बोलले हे मात्र काही समोर आलं नाही. सगळया महाराष्ट्राला तो एक शब्द कोणता, याची उत्सुकता लागली आहे.

नारायण राणे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, ‘पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजकांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास व्हावाबाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. ते म्हणाले तुझी तिकडे गरज आहे. 90 साली जिल्हा फिरलो. फेब्रुवारी महिन्यातही जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं. जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते. अनेक गावांना वीज नव्हती. 90 सालापर्यंत अंधारात लोक राहायचे. इथली मुलं कितीही शिकली तरी नोकरीसाठी मुंबईला जायची. मुंबईवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात मी आलो. तेव्हा मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा.उद्धवजी, हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं. त्यात माझा स्वार्थ नव्हता. मी छोटा-मोठा उद्योजकही आहे. सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल याचा विचार मी केला. तेव्हा विमानतळाचा मुद्दा समोर आला. तेव्हा मी टाटाकडे गेलो. बाजूला गोवा आहे, तुम्हाला समुद्र लाभलाय. पर्यटनाच्या दृष्टीने पोषक जिल्हा आहे. 95 ला युतीची सत्ता आली. मनोहर जोशींना मी सांगितलं की पर्यटन जिल्हा करु. तेव्हा केंद्राकडे परवानगी मागितली आणि देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग झाला.
साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही. सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना क्रेडीट टीमला द्यायचा. तसं माझं आहे. उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला एक विनंती आहे. याच जागेवर मी व प्रभू साहेब भूमिपूजनासाठी आलो. त्यावेळी काही लोक समोर आंदोलन करत होते. विमानतळ नको म्हणत होते. मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आमचं भागवा आणि रस्ता सुरु करा, अशी मागणी करायचे. रस्ता कोण अडवतं विचारा जरा…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.