Homeकोंकण - ठाणेचिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाला युट्युब व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश न दिल्याने...

चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाला युट्युब व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश न दिल्याने कार्यक्रमावर बहिष्कार…

तर आज खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या आंजिवडे घाटच्या पाहणी दौरा कार्यक्रमावरही पत्रकारांनी बहिष्कार टाकला.

सिंधुदुर्ग प्रतिनिधी.

चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाला युट्युब व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश कार्ड माहिती अधिकाऱ्यांनी देण्यास उडवाउडविची उत्तरे दिल्याने जिल्ह्यातील सर्व युट्युब व सोशल मिडिया पत्रकार यांनी ९ ऑक्टोबर रोजी होण्याऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनीही यावेळी दुजोरा दिला आहे.
जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंजिवडे घाट पाहणीसाठी खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक आले असता सर्व युट्युब व सोशल मिडिया पत्रकारांनी माणगाव येथे भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.व आंजिवडे घाट पाहणी कार्यक्रमावरही आज बहिष्कार टाकला

यावेळी खासदार राऊत यांच्याशी चर्चा केली असता, राऊत यांनी फक्त ३५ पत्रकारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यातील मुंबई व सिंधुदुर्ग येथील ७० पत्रकारांची यादी आली आहे. त्यातील ३५ पत्रकारांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांनी पत्रकारांच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रार्दुभाव होणार आहे का, यावेळी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार नाही का, या कार्यक्रमाला कोरोनाच्या सर्व अटी शर्तीचे पालन केले जाणार आहे का, असे सवाल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले.

यावेळी खासदार यांनी जिल्ह्यामध्ये ३५० पत्रकार असल्याचे उल्लेख केला आहे. जर युट्युब व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश नाही असे त्यांचे म्हणणे असेल तर काही युट्युब व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश कार्ड कशी देण्यात आली जर खासदार व पालकमंत्री यांना चिपी विमानतळ कार्यक्रमासाठी युट्युब व सोशल मिडियाची गरज नसेल तर आज पासून खासदार व पालकमंत्री यांच्या सर्व कार्यक्रमला आम्ही पत्रकार बहिष्कार टाकत असल्याचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, उपाध्यक्ष समील जळवी, कुडाळ तालुकाध्यक्ष कृष्णा सावंत,सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय भाईप, खजिनदार सिध्दिका भांडये, कुडाळ तालुका सचिव मिलिंद धुरी, आनंद कांडरकर, अल्लाउदिन खुल्ली तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.