आजरा. प्रतिनिधी.
उत्तुर ता. आजरा येथील तळेगल्लील मारुती हत्तीरगे यांच्या घरात तीन पाणी जुगार खेळताना आजरा पोलिस पथकाने टाकलेल्या छाप्यात दि. २ रोजी ९ जनावर कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात तीनपाणी जुगार खेळताना शिवाजी आप्पा माने. वय. ६१. रा. भडगाव. ता. गडहिंग्लज, प्रकाश कल्लापा शिंत्रे. वय ३६ रा. भडगाव, शंकर शामराव लोकरे. वय. ६६ रा. धामणे ता. आजरा., विकास मधुकर कुर्ले, वय. ३१ रा. बाळीग्रें. ता. कागल., किशोर श्रीपती पाथरवट वय. ४५ रा. गजरगाव, ता. आजरा, दिग्विजय विजय पाटील वय. ३५ रा. भडगाव, मलाप्पा गुंडाप्पा मोती वय. ५४.रा. भडगाव, शंकर तातोबा मगदूम वय. ६५ रा. धामणे ता. आजरा, अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसाच्या छाप्यात एक चारचाकी कार, एक मोटरसायकल, नऊ मोबाईल, सह रोक रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
अधिक तपास सपोनि.सुनिल हारगुडे करत आहेत.
