( बँकेला १३ कोटी ६७ लाखाचा विक्रमी ढोबळ नफा.)
आजरा. प्रतिनिधी.२९
आजरा येथील आजरा अर्बन बॅकेची ६१ वी. सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन सुरेश डांग होते. सभेच्या सुरवातीला दीपप्रज्वलन चेअरमन, व्हा चेअरमन, नगराध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत करताना आण्णा – भाऊ समुहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले येणाऱ्या काळात ठेवीबरोबर कर्जाचे प्रमाण चांगले ठेवु आजरा अर्बन हि आदर्श बॅक करणार करणार तसेच प्रधान मंत्री आवास योजना, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांची कर्ज योजना सुरू असून ग्राहकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन करत उपस्थित सभासदांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना चेअरमन श्री. डांग म्हणाले बॅकेच्या प्रगतीचा आढावा घेतला असून सभासद ठेवीदार हितचिंतक यांनी बॅकेवर ठेवलेल्या विश्वासामुळे कोरोणा काळातही बँकेला १३ कोटी ६७ लाखाचा विक्रमी ढोबळ नफा झाला असल्याचे स्पष्ट केले बॅकेला स्थापनेपासून ऑडिट ‘अ’ वर्ग मिळाले असल्याचे श्री. डांग यांनी जाहीर केले.
प्रशांत गंभीर यांनी नोटीस वाचन केले. बॅकेचे जेष्ट संचालक श्री. चराटी यांनी बॅकेने कोरोणा काळात केलेली प्रगती उल्लेखनीय असून सद्याचा काळही आव्हानात्मक आहे रिर्झव्ह बॅक ऑफ इंडियाइंडियाने बदलेल्या सूचनेचा पालन करत कर्जदार व सभासदांना लाभ घेण्यासाठी घरबांधणी, लहान खरेदी आशा वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्यावा तसेच नवरात्र, दिपावली दरम्यान कर्ज घेणारे कर्जदारांना प्रोसेसिंग फि. माफ केली जाईल आशा विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. चराटी यांनी केले.
यावेळी संस्थेचे सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.
सुत्रसंचालन संचालक शैला टोपले यांनी केले तर असिस्टंट जनरल मॅनेजर तानाजी गोईलकर यांनी आभार मानले.