आजरा. प्रतिनिधी.
आजरा सरोळी येथील विद्यमान उप. सरपंच रेश्मा परिट यांनी चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख अशोक निकम यांच्या अध्यक्षतेखाली व ता. प्रमुख युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेण्यात आला.
यावेळी उप. ता. प्रमुख संजय येसादे, सरोळी शाखा. प्रमुख संतोष पाटील, सागर पाटील, जय बारस्देसकर, विजय पाटील, सुधाकर पाटील, तसेच युवा सेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
सौ. परिट यांच्याकडे लवकरच विभागातील महिला आघाडीची जबाबदारी देण्यात येणार आहे.