आजरा. प्रतिनिधी.२९
आजरा शेतकरी सहकारी सूत गिरणी ही संचालक मंडळ, व्यवस्थापन, कामगार व सभासदांच्या सहकार्यामुळे आजरा सूतगिरणी स्वयमबाळावर चालू असून यापुढेही स्वबळावर चालू राहणार असे अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले ते आजरा सूतगिरणीच्या ४१ व्या वार्षीक सभेत बोलत होते. आजरा येथील शेतकरी सहकारी सुतगिरणी लि.खेडे वार्षिक सर्वसाधारण सभा सुतगिरणी सभागृहात दि २९ रोजी ऑनलाइन संपन्न झाली. स्वागत चेअरमन श्रीमती अन्नपूर्णा चराटी यांनी केले. सभेच्या सुरवातीला प्रतिमापुजन व दीपप्रज्वलन संचालक मंडळ यांच्या हस्ते झाले. समुहाचे प्रमुख श्री. चराटी पुढे म्हणाले आजरा सुतगिरण ही देशातील १० सूतगिरणी पैकी एक असून राज्यात नावलौकिक मिळवला आहे. येथील कामगार १८ ते २० हजार पर्यंत वेतन घेत असून आजरा सूतगिरणीचे गारमेंट लवकरच राज्यात एक ब्रँड म्हणून पुढे येईल या पद्धतीने आजरा सुतगिरण व गारमेंट व्यवस्थापनाची वाटचाल सुरू आहे.
चांगल्या दर्जाची कपडे सर्वसामान्य लोकांनी घ्यावी या दरात आम्ही विक्री सुरू ठेवले आहे या गारमेंट देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. गारमेंट च्या माध्यमातून तालुक्यातील अनेक महिलांना रोजगार मिळत असून अजूनही नोकर भरती सुरू आहे तालुक्यातील महिला भगिनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी श्री. चराटी यांनी बोलताना केले. यावेळी सूतगिरणीचे ॲडव्हायझर चंद्रशेखर फडणीस बोलताना म्हणाले की देशामध्ये वस्त्रोद्योगाला उद्योगाला मंदी असताना राज्यातील काही संस्था सूतगिरण्या बंद होत्या परंतु आजरा सुतगिरण अनेक अडचणींचा सामना करत चांगल्या पद्धतीने स्वयमबळवर सुरू आहे. मंदी काळामध्ये कारखाना व्यवस्थापन व कामगारांचे यांचे देखील फार मोठे योगदान आहे. यामध्ये चेअरमन. श्रीमती चराटी यांचे वेळोवेळी लक्ष – योग्य वेळी मार्गदर्शन कामगारांच्या सुख- दुःखामध्ये त्यांचं नेहमी लक्ष असतं अलिकडे दीड कोटी रुपये पगार वाढ केली असून आजरा सुतगिरण अखंडपणे चांगल्या पद्धतीने चालू राहील कारण ज्या संस्थेमध्ये राजकारणाला प्रवेश नसतो ती संस्था नक्कीच चांगल्या पद्धतीने चालत असते असे श्री फडणीस मार्गदर्शन करताना म्हणाले.
यावेळी सभेची नोटीस वाचन व मंजुरी चिफ अकौंउटंट विष्णू पोवार यांनी केले सभेमध्ये सर्व विषयांना मंजुरी मिळाली. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. आभार संचालक रजनीकांत नाईक यांनी मानले राष्ट्रगीताने वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
चौकट. –
{ कै. माधवराव देशपांडे (भाऊ ) स्मृतिप्रीत्यर्थ देशपांडे कुटुंबियांचे वतीने आदर्श कर्मचारी पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते मेन्टेनन्स विभागाचे कर्मचारी दिलीप कांबळे यांना देण्यात आला.
यावेळी आजरा नगरीचे नुतन उपनगराध्यक्ष बाळ केसरकर यांचा सत्कार आजरा सुतगिरणी वतीने करण्यात आला. }