मुंबई. प्रतिनिधी. १७ –
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिला आहेत. नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल मतभेद असले तरी त्यांच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच देशातल्या महागाईविरोधात जनतेच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे मोदीजी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील, अशा खोचक टोलाही संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी मोदींचं कौतुक करताना म्हणाले, “नरेंद्र मोदी हे देशातले मोठे नेते आहेत. ते आता देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या संघर्षाचा काळ आम्ही जवळून पाहिला आहे. त्यांच्या कार्यकालात देशाला राजकीय स्थैर्य आलं आहे. आत्तापर्यंत आघाडीमध्ये राहून सत्तेवर येणाऱ्या भाजपाकडे एकहाती सत्ता येणे ही मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे हे मान्य केलं पाहिजे.नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही. त्यांच्या भूमिकेविषयी, कार्याविषयी कितीही वाद असले तरी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना आपण शुभेच्छा द्यायला हव्यात आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो”.
