अर्दाळ येथे आर.बी.एस.के. पथक क्र. १ तर्फे ऊसतोड कामगार व मुलांची आरोग्य तपासणी.
५ वर्षे तक्रारी करूनही काळी राख थांबेना ; गवसे ग्रामस्थांचा ३० नोव्हेंबरला कारखाना गेटवर ठिय्या आंदोलनाचा इशारा
गवसे, ता. आजरा – प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. गवसे येथून होणाऱ्या काळ्या राखेच्या प्रदूषणाबाबत गेली ५ वर्षे ग्रामपंचायत गवसे मार्फत वेळोवेळी अर्ज देऊन पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई व तपासणी झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गवसे ग्रामस्थांनी दि. ३०/११/२०२६ रोजी कारखाना गेट स्थळावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अर्जदार श्री. मारुती रामचंद्र डोंगरे व सर्व ग्रामस्थ मौजे गवसे यांनी कारखान्याचे चेअरमन यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आमच्या गावाजवळील वसंतराव देसाई शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणारी काळी राख व धुराचे कण वाऱ्यामुळे साधारण २ ते ३ किमी गावातील लोकवस्तीत पसरत आहेत. या राखेमुळे नागरिकांच्या घरांमध्ये, अंगणात, पिण्याच्या पाण्यात तसेच अन्नपदार्थांवर राख साचत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना यांचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या राखेमुळे पर्यावरण सुद्धा दूषित होत आहे. जसे की, जनावरांवर रोगराई पसरत आहे, शेतामधील पिके कुजणे, पर्यावरणामध्ये राख पसरल्याने रहदारीच्या लोकांना सुद्धा आजार पसरत आहेत.
गेली ४ ते ५ वर्षे ग्रामपंचायत गवसे यांच्या मार्फत वेळोवेळी साखर कारखान्याला अर्ज देऊन पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई व तपासणी झालेली नाही. काल दि. १३/११/२०२६ रोजी मी अर्जदार व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने कारखान्याला अर्ज दिला होता तसेच त्यांना दि. २३/११/२०२६ पर्यंत वरील प्रदूषण रोखण्यासाठी मुदत देऊन सुद्धा पुन्हा राख मोठ्या प्रमाणात आज पर्यंत विसर्जित करण्यात येत आहे. वेळोवेळी कारखाना प्रशासनास निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.
त्यामुळे मी व गवसे ग्रामस्थ दि. ३०/११/२०२६ रोजी कारखाना गेट स्थळावर ठिय्या आंदोलन करणार आहोत, याची आपण दखल घ्यावी. सदर अर्जाचा विचार करता आपण या गोष्टींची तातडीने तपासणी करून योग्य ती कारवाई करावी, ही नम्र विनंती.
तसेच गेल्या ५ वर्षातील ग्रामपंचायतीने पाठपुरावा केलेली वरील संदर्भीय पत्रे जोडत आहे. तरी या गंभीर समस्येची तातडीने दखल घेण्यात यावी तसेच आपल्या विभागामार्फत केलेल्या तपासणीचा व कार्यवाहीचा लेखी अहवाल आम्हाला कळवावा, ही आपणास विनंती आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनातील ग्रामस्थांच्या ५ मागण्या .
१) संबंधित साखर कारखान्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी.
२) चिमणीतील प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची कार्यक्षमता तपासावी.
३) गावातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी करून आवश्यक नमुने घ्यावेत.
४) कारखान्यातून बाहेर पडणारी काळी राख व धूर रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत.
५) पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी.
ग्रामस्थांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याने कृपया या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर ग्रामस्थ मारुती डोंगरे सह
१) संतोष नेवगे, २) सचिन पाटील, ३) प्रमोद पांडुरंग पाटील, ४) अविनाश हेब्बाळकर, ५) गिरिश पाटील, ६) मॅक्वीन फर्नांडिस, ७) मिल्टन फर्नांडिस, ८) रविंद्र देवेकर, शिवराज पाटील, १०) महेश पाटील, ११) धर्मेश पाटील, १२) सुधाकर लाड, १३) सुमित पाटील, १४) पांडुरंग माने, १५) कार्तिक पाटील, १६) सुरज शेटगे, १७) जयवंत पाटकर, १८) संदीप वास्कर, १९) मारुती पाटील, २०) आकाश पाटील, २१) किशोर पाटील, २२) राकेश डोंगरे, २३) जेम्स फर्नांडिस, २४) शुभम शेटगे, २५) कपिल मालेकर, २६) राजाराम पाटील, २७) सतीश काबळे, २८) निलेश पाटील, २९) पांडुरंग कुरले, ३०) पृथ्वीराज पाटील, ३१) निखील पाटील, ३२) बालमुकुंद पाटील, ३३) सागर वास्कर, ३४) पांडुरंग पाटील, ३५) पंकजकुमार पाटील, ३६) राकेश माळवे, ३७) त्रिदिप पाटील, ३८) संतोष देसाई आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
अर्दाळ येथे आर.बी.एस.के. पथक क्र. १ तर्फे ऊसतोड कामगार व मुलांची आरोग्य तपासणी.
आजरा (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेल्या आजरा येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) पथक क्र. १ च्या वतीने आज दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी अर्दाळ येथील ऊस फडावर जाऊन ऊसतोड कामगार व त्यांच्या लहान मुलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली.
ऊसतोड हंगामासाठी आलेल्या कामगारांच्या कुटुंबांना आणि विशेषतः त्यांच्या लहान मुलांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने पथकाने थेट कामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. यावेळी मुलांची आरोग्य नोंदणी करून त्यांना आवश्यक औषधे वितरित करण्यात आली तसेच स्वच्छता व आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरजीत पांडव, डॉ. स्वाती रेडेकर, औषध निर्माण अधिकारी (Pharmacist) सारिका शिंदे आणि आरोग्य सेविका (ANM) सुषमा साठे यांनी सहभाग घेतला. थेट शेतात येऊन आरोग्य सेवा दिल्याबद्दल कामगार वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.

