Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रदेशभरात 1 मार्च म्हणजेच सोमवार पासून काही नियम लागू होणार. - काय...

देशभरात 1 मार्च म्हणजेच सोमवार पासून काही नियम लागू होणार. – काय आहेत नियम पहा.

देशभरात 1 मार्च म्हणजेच सोमवार पासून काही नियम लागू होणार. – काय आहेत नियम पहा.

नवीदिल्ली. वृतसंस्था.

देशभरात 1 मार्च म्हणजेच सोमवार पासून काही नियम लागू होणार आहेत. यामध्ये काही नियम असे आहेत त्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे सध्याच्या काळात बदललेल्या नियमांबद्दल जाणून घेणे अत्यावश्यक असणार आहे. कारण असे न केल्यास तुमची काही कामे खोळंबून राहण्याची शक्यता आहे. यासाठी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणते कोणते नियम बदलणार आहेत.(1 मार्चपासून दुधाची किंमत प्रति लिटर 100 रुपये होणार? ट्विटरवर का ट्रेंड होतोय ‘हा’ हँशटॅग, जाणून घ्या सविस्तर)

‘या’ बँकेच्या ATM मधून निघणार नाहीत 2 हजारांची नोट

सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेच्या कोणत्याही एटीएम मधून ग्राहकांना 2 हजार रुपयांची नोट मिळणार नाही आहे.
मात्र ग्राहक बँकेच्या काउंटवरुन 2 हजारांची नोट घेऊ शकतात. इंडियन बँकेने असे म्हटले आहे की, एटीएम मधून पैसे काढल्यानंतर ग्राहकांना 2 रुपयांचे सुट्टे मिळण्यासाठी बँकेत येतात. त्यामुळेच तत्काळ 2 रुपयांच्या नोटा एटीएम मधून दिल्या जाणार नाहीत.

टोल प्लाझावर मोफत मिळणार नाही FASTAG

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) यांनी असे म्हटले आहे की, 1 मार्च पासून देशभरातील टोल प्लाझावर फास्टॅग खरेदी करण्यासाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत. म्हणजेच 28 फेब्रुवारीनंतर मोफत फास्टॅग खरेदी करण्याची सुविधा बंद केली जाणार आहे.

एसबीआयच्या ग्राहकांसाठी KYC अनिवार्य

1 मार्च पासून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या युजर्सला केवायसी (KYC) करणे अनिवार्य असणार आहे. असे न केल्यास खातेधारकांचे अकाउंट बंद केले जाणार आहे. यासाठी एसबीआय ग्राहकांना आपले अकाउंट अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी केवायसी जरुर पूर्ण करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.