Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रकुत्र्यांना शोधून काढणा-याला लेडी गागाकडून 3.65 कोटींचे बक्षीस.

कुत्र्यांना शोधून काढणा-याला लेडी गागाकडून 3.65 कोटींचे बक्षीस.

कुत्र्यांना शोधून काढणा-याला लेडी गागाकडून 3.65 कोटींचे बक्षीस.
नवीदिल्ली. वृतसंस्था.

प्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागाच्या लॉस एंजेलिसमधील घराबाहेर हल्ला झाल्याने सा-यांनाच धडकी भरली आहे .लेडी गागाकडे फ्रेन्च बुलडॉग जातीचे तीन कुत्रे होते. २०१६ मध्ये तिने हे कुत्रे घेतले होते. एका व्यक्तीने लेडी गागाच्या पाळीव कुत्र्यांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. यांत डॉग वॉकरला गोळी लागली. सुदैवाने तो या हल्ल्यातून बचावला आहे. हा डॉग वॉकर लेडी गागाच्या तीन कुत्र्यांना बाहेर फिरायला घेऊन गेला होता. यापैकी दोन कुत्रे चोरीला गेले, तर एकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता.
आता दोन कुत्र्यांचा शोध सुरु आहे. दोन कुत्रे कोजी आणि गुस्ताव यांना शोधण्यासाठी लेडी गागाने मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर शोधून आणणा-याला कोणतीही प्रश्नोत्तरे केली जाणार नाहीत, हेदेखील सांगण्यात आले आहे. कुत्र्यांना शोधून काढणा-याला लेडी गागाकडून 3.65 कोटींचे बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.