Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र आजरा-आंबोली मार्गावर एमडी ड्रग्ससह दोघांना अटक.

आजरा-आंबोली मार्गावर एमडी ड्रग्ससह दोघांना अटक.

Oplus_131072

आजरा-आंबोली मार्गावर एमडी ड्रग्ससह दोघांना अटक.

आजरा | प्रतिनिधी.

आजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजरा-आंबोली रोडवरील शबाज फार्मकडे जाणाऱ्या मार्गावर एमडी ड्रग्स घेऊन दोघे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सरवदे यांच्या नेतृत्वाखाली आजरा पोलीस ठाण्याचे पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन पंचांसह संयुक्त कारवाई करत सापळा रचला.
या कारवाईत अन्वर असलम शेख (वय ३४, रा. सरनाईक वसाहत, जवाहरनगर, कोल्हापूर) आणि किरण दडप्पा माने (वय ३३, रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १६ ग्रॅम एमडी पावडर, एक्सेस मोपेड स्कूटर व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.