🟣कै. बाबुराव कुंभार यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य ओपन कबड्डी स्पर्धा.
🟡झुलपेवाडी (हाळवाडी) येथे अपुरा व अशुद्ध पाणीपुरवठा; ग्रामस्थांची ग्रामसेवकांकडे तक्रार
🟣कै. बाबुराव कुंभार यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य ओपन कबड्डी स्पर्धेचे आयोजन
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथे भाजपचे नेते कै बाबुराव कुंभार यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आजरा तालुका स्वर्गीय बाबुराव कुंभार विचार मंच व आजरा भाजप, पंडित दीनदयाळ हायस्कूल यांच्या वतीने भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आले. स्वागत श्री देसाई सर यांनी केले. प्रास्ताविक सुधीर कुंभार यांनी केले यावेळी बोलताना आजरा साखर चे माजी संचालक मलिक कुमार बुरुड म्हणाले कै बाबुराव कुंभार यांनी हातात घेतलेले कोणतेही काम पूर्ण करायचे जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढायचे, त्यांनी त्याकाळी सत्तेतील दिवस हे कमी पाहिले पण विरोधी पक्षात राहून नेहमी भारतीय जनता पार्टीचे पक्ष वाढीसाठी चांगले काम केले. त्यांचा शेती व्यवसाय देखील हातखंडा होता. यांच्या स्मृतिदिनानिमित्त कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील कबड्डी प्रेमी कबड्डी संघाने मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्ताविक करताना सुधीर कुंभार म्हणाले कै बाबुराव कुंभार यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात शुक्रवार दि. ३० रोजी होणारा दहावा स्मृतिदिन आहे. यावर्षी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या सुरुवातीला जिल्ह्यातील नामांकित महिलांचा कबड्डी सामना होणार आहे. येणाऱ्या सर्व स्पर्धकांना चहा जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असून दोन दिवस सामने चालणार आहेत सायंकाळी पाच ते रात्री अकरा असे वेळापत्रक असून कबड्डी असोसिएशनच्या नियमानुसार सामने होणार आहेत. यासाठी पंच शिवाजी बोलके सर यांच्यासह सर्व पंच या स्पर्धेसाठी उपस्थित राहून स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य करणार आहेत. सद्या स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगात वेगवेगळे प्रेरणादायी उपक्रम राबवत आहोत.
या स्पर्धेसाठी बक्षिसे
प्रथम क्रमांक.- २५ हजार ५५५
द्वितीय क्रमांक- १५ हजार ५५५
तृतीय क्रमांक – ११ हजार १११
अशी बक्षसे असून
या स्पर्धेत मोठ्या संख्येने कबड्डी संघाने सहभाग घ्यावा.
असे सुधीर कुंभार म्हणाले
यावेळी नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार म्हणाल्या कै बाबुराव कुंभार हे राजकारण समाजकारण कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यकाची आवड असणारे एक कबड्डीपटू होते. आपल्या जिल्ह्यातील कबड्डीपटू व चांगले संघ पुढे यावेत यासाठी कै. बाबुराव कुंभार विचारमंच व आजरा तालुका भारतीय जनता पार्टी पंडित दीनदयाल हायस्कूल यांच्या वतीने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील संघाने सहभाग घ्यावा असे बोलताना सौ डॉ कुंभार म्हणाल्या
या बैठकीला नाथ देसाई, गौरव देशपांडे, धनाजी पालपोकर, सह कै बाबुराव कुंभार विचार मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

🟡झुलपेवाडी (हाळवाडी) येथे अपुरा व अशुद्ध पाणीपुरवठा; ग्रामस्थांची ग्रामसेवकांकडे तक्रार
आजरा :- प्रतिनिधी.
झुलपेवाडी (हाळवाडी) भागात गेल्या काही वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासोबतच पुरवले जाणारे पाणी अशुद्ध व गढूळ असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणाऱ्या तक्रार अर्जाचे निवेदन ग्रामस्थांनी झुलपेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक यांना दिले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, गावात पाणी येण्याची कोणतीही निश्चित वेळ नाही. पाणी आल्यानंतरही ते अवघ्या काही मिनिटांतच बंद होते. त्यामुळे दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी मिळवणे कठीण झाले आहे. नियमित पाणीपट्टी भरूनही ग्रामपंचायतीकडून योग्य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. गढूळ पाण्यामुळे आजारपण पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या मुख्य मागण्या:
पाणीपुरवठा करण्याची वेळ निश्चित करण्यात यावी.
पुरेशा दाबाने (प्रेशरने) आणि योग्य प्रमाणात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी.
या निवेदनावर अनिकेत महादेव अस्वले, सुशांत अजित एकल, दिनकर भैरू मातुल, श्रीधर दादू बेळवेकर, कृष्णा बाळू मगदूम, जोतीराम बंडू बेलवाडडकर, सौरभ सुनिल एकल, शिवाजी रामचंद्र एकल, गणेश दत्तात्रय एकल यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या समस्येचे लवकरात लवकर निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

