आजरा येथे एका फायनान्स कंपनीत १० लाख ६२ हजारांचा अपहार; चौघांवर गुन्हा दाखल.
आजरा .- प्रतिनिधी
भारत फायनान्स इन्क्लुजन लि. कंपनी, शाखा रघुनाथ कॉलनी, आजरा येथे तब्बल रू. १०,६२,०४५/ चा अपहार केल्याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा रजि. नं. २४१/२०२६, BNS कलम ३१४, ३१६(५), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी:- विष्णुदास माधवराव पांचाळ, वय ३१, व्यवसाय – नोकरी (ब्रँच मॅनेजर – भारत फायनान्स इन्क्लुजन लि., आजरा शाखा)
आरोपी:
१) प्रथमेश विजय कुंभार, वय २६, रा. कोल्हापूर (फिल्ड असिस्टंट)
२) ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार, वय २५, रा. खरसोळी, ता. जि. सोलापूर (फिल्ड असिस्टंट)
३) साहील संजय लोखंडे, वय २२, रा. कोळविंदे, ता. आजरा (फिल्ड असिस्टंट)
४) पंकज संजय तेलशिंगे, वय २८, रा. कुपवाड MIDC, सांगली (ब्रँच मॅनेजर)
घटनेतील हकीकत:- आरोपी क्र. १ ते ३ हे कंपनीत संगम व्यवस्थापक (फिल्ड असिस्टंट) तर आरोपी क्र. ४ हे तत्कालीन ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी दि. १०/०४/२०२४ ते २६/११/२०२५ या कालावधीत कंपनीच्या आजरा शाखेतील एकूण ४७ सदस्य / कर्जदार यांच्याकडून मुदतपूर्व कर्जफेडीच्या नावाखाली एकूण रू. १०,६२,०४५/- स्वीकारले. मात्र सदर रक्कम कंपनीत जमा न करता स्वतः वापरून विश्वासघात व फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा दि. २७/१०/२०२६ रोजी दाखल झाला असून पुढील तपास पो.स.इ. वैभव जमादार हे करीत आहेत.
