Homeकोंकण - ठाणेफणसाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास; ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू.

फणसाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास; ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू.

फणसाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास; ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील एरंडोळ येथे फणसाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याने ५८ वर्षीय शिवाजी धोंडिबा पताडे यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पताडे हे मागील तीन वर्षांपासून आजरा येथे औषधोपचार घेत होते. त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या फणसाच्या झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच वर्दीदारांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेह पुढील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
याप्रकरणी पोहेकॉ ६५५ शिकलगार यांनी दाखल अंमलदार म्हणून काम पाहिले असून, पोहेकॉ ११०१ हजारे हे तपासी अंमलदार पुढील तपास करत आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.