उत्तूर बसस्थानकाच्या बांधकामासाठी सुरू असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित.
आजरा | प्रतिनिधी .
उत्तूर (ता. आजरा) येथील बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटनेच्या वतीने दि. १८ ऑगस्ट २०१६ पासून सुरू असलेले बेमुदत धरणे व लाक्षणिक उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून काम स्थगित करण्याची विनंती करण्यात आल्यानंतर बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र काम सुरू ठेवण्याबाबत स्पष्टता नसल्याने प्रवासी संघटनेने महामंडळाला एक महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
महामंडळाने जनभावनेचा विचार करून बसस्थानकाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



