Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रज्ञानाच्या वाटेवर सायकलींची साथ;भादवण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दातृत्वाची अनमोल भेट……

ज्ञानाच्या वाटेवर सायकलींची साथ;भादवण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दातृत्वाची अनमोल भेट……

ज्ञानाच्या वाटेवर सायकलींची साथ;भादवण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दातृत्वाची अनमोल भेट……

आजरा : – प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासाला गती देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा प्रेरणादायी सायकल वितरण सोहळा भादवण हायस्कूल, भादवण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.जी.कुंभार यांनी केले. आजरा महाल शिक्षण मंडळ, आजरा संचलित भादवण हायस्कूल,भादवण येथील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास कमी व्हावा,त्यांच्या शिक्षणात सातत्य राहावे आणि शिक्षणाच्या वाटचालीला अधिक वेग मिळावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना,जिद्दीला आणि उज्ज्वल भविष्यातील वाटचालीला मिळालेली प्रेरणेची चाके आहेत,अशी भावना यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष के.जी.पटेकर यांनी व्यक्त केली. प्रातिनिधिक स्वरूपात पालकांच्या वतीने स्वाती सचिन पाटील यांनी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराच्या पदाधिकाऱ्यांनी राबविलेल्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भादवण हायस्कूल,भादवण प्रशाला हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्नशील बोलताना म्हणाले

या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या संचालक सुधीर जाधव यांचा दातृत्वाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के.जी.पटेकर,खजिनदार सुनील पाटील,उद्योजक सचिन शिंपी,ज्येष्ठ संचालक सुधीर जाधव,विलास पाटील,पांडुरंग जाधव यांच्यासह मान्यवर,पालक स्वाती पाटील, सुमित्रा पाटील,दत्तात्रय पाटील, विजय गवळी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आजरा महाल शिक्षण मंडळ,आजराचे अध्यक्ष जयवंतरावजी शिंपी,सचिव अभिषेकदादा शिंपी व सर्व संचालक यांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेद मिळते,त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ‘शिक्षणातून प्रगती,प्रगतीतून उज्ज्वल भविष्य’ या संकल्पनेला बळ मिळते. या सायकलींच्या माध्यमातून त्यांच्या शाळेच्या वाटेवरील अंतर कमी होणार असून,त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास मात्र अधिक वेगवान होणार आहे. दातृत्वाच्या या प्रेरणादायी उपक्रमातून ‘एक सायकल, अनेक स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्याची नवी वाट’असा सुंदर संदेश समाजासमोर आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विषय शिक्षक प्रशांत गुरव यांनी केले तर आभार विलास गवारी यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.