Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा मडिलगेत धाडसी चोरी; २ लाख ९५ हजारांचा ऐवज लंपास

आजरा मडिलगेत धाडसी चोरी; २ लाख ९५ हजारांचा ऐवज लंपास

आजरा मडिलगेत धाडसी चोरी; २ लाख ९५ हजारांचा ऐवज लंपास.


आजरा | प्रतिनिधी.


आजरा तालुक्यातील मडिलगे येथे घरातून सुमारे २ लाख ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा संतोष घाडगे (वय ३७, रा. मडिलगे, ता. आजरा) यांच्या राहत्या घरात सकाळी सुमारे ९.४५ ते ११.१५ या कालावधीत चोरी झाली. अज्ञात चोरट्याने जनावरांच्या गोठ्यातील उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून आतील खोलीतील तिजोरीत ठेवलेला ऐवज लंपास केला.
चोरीस गेलेल्या ऐवजात अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे सोन्याचे गंठण, ९० हजार रुपये किमतीची दीड तोळे सोन्याची चैन, ३० हजार रुपयांची अर्धा तोळे सोन्याची मण्यामण्यांची लांबी व २५ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी आजरा पोलीस ठाणे गु.र.नं. १९५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस हवालदार येळकर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.