Homeकोंकण - ठाणेआजरा - बेकरी व्यावसायिकाकडे तीन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप.- दोघांविरुद्ध आजरा पोलिसांत...

आजरा – बेकरी व्यावसायिकाकडे तीन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप.- दोघांविरुद्ध आजरा पोलिसांत गुन्हा.

आजरा – बेकरी व्यावसायिकाकडे तीन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप.- दोघांविरुद्ध आजरा पोलिसांत गुन्हा.

आजरा : प्रतिनिधी.

आजरा शहरातील संभाजी महाराज चौक परिसरात बेकरी व्यवसाय करणाऱ्या ६१ वर्षीय व्यावसायिकाकडे तीन लाख रुपये खंडणीची मागणी करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आजरा येथील संभाजी चौकातील एक्सपर्ट बेकरीच्या वरच्या मजल्यावर राहतात. २ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता संशयित आरोपी घरात आले. यावेळी त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तीन लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर एका आरोपीने फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी समाकीलाल मटरलाल निपाड (रा. नंगलानंदा, ता. इटावा, जि. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) आणि राजकुमार इंदरसिंग निपाड (रा. नंगलानंदा, ता. इटावा, जि. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८२/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्यात रिव्हॉल्व्हर व चाकू यांचा वापर झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.