Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा पंचायत समिती सभापती पद रिक्त

आजरा पंचायत समिती सभापती पद रिक्त

आजरा पंचायत समिती सभापती पद रिक्त

आजरा.- प्रतिनिधी.

पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी हे पद भरण्यासाठी कार्यक्रम घोषित केला होता.आज दि.३० रोजी याची निवड प्रक्रिया तहसिलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात पार पडली. गट
विकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते. पंचायत समिती सभापती पद इतर मागास महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सभागृहात दोन महिला आहेत. यातील जयश्री गाडे यांचा सभापती पद अवैध ठरल्याने आता केवळ उपसभापती यशोदा पोवार ह्या पात्र आहेत. परंतु सौ. यशोदा पोवार यांनी अर्ज न दाखल केले मुळे आजरा पंचायत समिती सभापती पद रिक्त राहिले आहे. या बैठकीला पंचायत समिती सदस्य विकास चोथे, व समीर पारदे दोन सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.