Homeकोंकण - ठाणेकाजू वृक्षांचे संयुक्त पंचनामे करावे. - शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांना आवाहन.- ( शेतकरी...

काजू वृक्षांचे संयुक्त पंचनामे करावे. – शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांना आवाहन.- ( शेतकरी संघटनेच्या प्रयत्नाला यश.)

काजू वृक्षांचे संयुक्त पंचनामे करावे. – शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांना आवाहन.- शेतकरी संघटनेच्या प्रयत्नाला यश.

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

चालू वर्षी काजू पिकाला मोहोर फार कमी प्रमाणात लागलेला होता, किंवा लागलेला सुद्धा गळून गेल्याने काजू पिकाचे उत्पादन घटल्याच्या अनेक बाबी निदर्शनास आल्या होत्या. सदर बाबीची दखल घेत, शासनाने काजू नुकसान संयुक्त पंचनामे लावलेले आहेत. याबाबत शेतकरी संघटनेने आवाज उठवला होता. शासनाने संयुक्त पंचनामाचे निर्णय घेतल्यामुळे शेतकरी संघटनेच्या मागणीला यश आले आहे
ज्या शेतकऱ्यांच्या काजू बागा आहेत, अशा शेतकऱ्यांनी सोमवार पर्यंत आपले अर्ज ग्रामपंचायत कार्यालय/ग्रामसेवक यांचेकडे जमा करावेत. तद्नंतर पंचनामा कमिटी (ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत पंच) तर्फे संयुक्त पंचनामा करण्यात येईल.

पंचनामा फॉर्म चा नमुना सोबत देत आहे. या फॉर्म सोबत खालील कागदपत्रे जोडावीत. आणि संपूर्ण बंच जमा करावा, अर्धवट आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. एकापेक्षा अधिक गटात काजू पीक असेल तर एकाच अर्जासोबत सर्व गटांचे सातबारा/आठ अ उतारा, संमतीपत्र आणि स्वघोषणपत्र जोडावे.

💥कागदपत्रे

  1. नमुना फॉर्म
  2. या महिन्यात काढलेला सातबारा उतारा
  3. या महिन्यात काढलेला आठ अ उतारा
  4. सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (अर्जात नमुना आहे)
  5. बँक पासबुक च्या प्रथम पानांची प्रिंट
  6. आधार कार्ड झेरॉक्स
  7. स्वयंघोषणपत्र (अर्जात नमुना आहे)
  8. फार्मर आयडी क्रमांक प्रिंट
  9. महाविस्तार AI अँप वर नोंदणी केल्याचा स्क्रीनशॉट प्रिंट (ज्यात खातेदार शेतकऱ्याचे नाव दिसावे)

पंचनामा फॉर्म मध्ये शेतकऱ्यांनी केवळ आपले नाव भरावे आणि सही करावी, याव्यतिरिक्त कोणतीही माहिती भरू नये, अन्यथा असा फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविस्तार अँप डाउनलोड करून त्यावर रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. रजिस्ट्रेशन करताना आपला मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका आणि गाव बिनचूक भरावे. आणि त्या स्क्रीनशॉट ची प्रिंट सोबत जोडावी.
महाविस्तार अँप ची लिंक सोबत देत आहे. तसेच रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दल व्हिडीओ सुद्धा सोबत देत आहे.

अँप- https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai

व्हिडीओ- https://youtube.com/shorts/X9NyA14B4CA?si=GZ6yGxds2AU0qNua

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.