Homeकोंकण - ठाणेश्रीमंत गंगामाई वाचन मंदिरतर्फे आजरा तालुकास्तरीय समूहगीत स्पर्धा. ( स्वातंत्र्य दिनानिमित्त 18...

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरतर्फे आजरा तालुकास्तरीय समूहगीत स्पर्धा. ( स्वातंत्र्य दिनानिमित्त 18 ऑगस्टला ‘मृत्युंजय’ दालनात आयोजन.)🟣 आजरा येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरतर्फे आजरा तालुकास्तरीय समूहगीत स्पर्धा. ( स्वातंत्र्य दिनानिमित्त 18 ऑगस्टला ‘मृत्युंजय’ दालनात आयोजन.)
🟣 आजरा येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरतर्फे आजरा तालुकास्तरीय समूहगीत स्पर्धा. ( स्वातंत्र्य दिनानिमित्त 18 ऑगस्टला ‘मृत्युंजय’ दालनात आयोजन.)

आजरा – प्रतिनिधी.

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. महादेव नारायण गव्हाणकार व कै. स्नेहलता निवृत्ती ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेची माहिती:

  1. ) दिनांक व वेळ : मंगळवार, दि. 18 ऑगस्ट 2026, सकाळी 10.30 वाजता
    २) ठिकाण: ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत स्मृती दालन, आय.सी.आय.सी.आय बँके शेजारी, आजरा
    ३) पात्रता: इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गट सहभागी होऊ शकतील
  2. नियम: देशभक्तीपर किंवा सुगम समूहगीत सादर करावे. प्रत्येक संघाला 1 गीतासाठी 5 मिनिटांचा वेळ. प्रत्येक संघात किमान 6 आणि कमाल 10 विद्यार्थी असावेत

बक्षिसे:

  • प्रथम क्रमांक: रुपये 3,000 रोख + स्मृतिचिन्ह + प्रशस्तीपत्र
  • द्वितीय क्रमांक रुपये 2,000 रोख स्मृतिचिन्ह + प्रशस्तीपत्र
  • तृतीय क्रमांक – रुपये 1,000 रोख + स्मृतिचिन्ह + प्रशस्तीपत्र

बाहेरील गावांतील सहभागी संघांना रुपये 250 प्रवासखर्च देण्यात येणार आहे.

नावनोंदणी : दि. 17 ऑगस्ट 2026 पर्यंत श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा येथे करावी.

ही स्पर्धा डॉ. पूजा पराग सामंत, स्नेहलता ठाकूर फाउंडेशन उत्तूर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली आहे.

आजरा तालुक्यातील सर्व शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी यांनी केले आहे.

🟣 आजरा येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

आजरा.- प्रतिनिधी.

दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दिनांक २३ जुलै २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला आजरा तालुक्यातील सर्व व्यापारी संघटना, व्यापारी बांधव तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बंदला सहकार्य करून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिल्याबद्दल वंचित बहुजन युवा आघाडी आजरा, यांच्या वतीने तालुक्यातील सर्व व्यापारी संघटना, व जनतेने दिलेल्या
सहकार्य ने आजरा बंदला प्रतिसाद मिळाला असलेले मत तालुका अध्यक्ष संतोष मासोळे यांनी व्यक्त केले. अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने लढण्याची ताकद अधिक बळकट करणार्यांसाठी संविधानाच्या मार्गाने आजचा महाराष्ट्र
बंद यशस्वी केल्याचे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे यांनी सांगितले. यावेळी भिकाजी कांबळे. कॉ. काशिनाथ मोरे, रुपाली कांबळे, सेक्युलर मुव्हमेंट जिल्हा अध्यक्ष अजय देशमुख यांनी मनोगते व्यक्त केले, उपस्थित प्रवीण कश्यप, शाखा अध्यक्ष राहूल शिपूरकर, काशिनाथ कांबळे, रिपब्लीकन सेना जिल्हा उपाध्यक्ष सुरेश दिवेकर, तालुका अध्यक्ष-अविनाश कांबळे , सुधीर कांबळे तसेच तालुक्यातून शिव शाहू, फुले आंबेडकर,पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, अनुयायी उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.