दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचितचा ‘महाराष्ट्र बंद’.( आजरा बंद ठेवण्याचे वंचित बहुजन आघाडीचे आवाहन.)
आजरा – प्रतिनिधी.
दिल्ली येथे २० जुलै रोजी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या व लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी वतीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आजरा तालुक्यातही २३ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडी आजरा तालुका अध्यक्ष संतोष मासोळे सह पदाधिकारी यांनी आजरा तहसीलदार, व आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “दिल्लीतील जंतरमंतर येथे नोट पेपरफुटी व शिक्षण व्यवस्थेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही लोकशाहीवर गदा आणणारी घटना आहे. या दडपशाहीच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्यात येणार आहे.”
त्यांनी सर्व समविचारी संघटना, विद्यार्थी आणि सर्व स्तरांतील नागरिकांनी एकत्र येऊन २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच बंद शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, काशिनाथ मोरे, महेश चे दत्तात्रय नार्वेकर, शोभा कांबळे, सुप्रिया डेळेकर, पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
