🛑 हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.
🛑सेक्युलर मुव्हमेंट महाराष्ट्र राज्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.
( जंतर-मंतर वरील आंदोलनाला पाठिंबा. )
🛑सेक्युलर मुव्हमेंट महाराष्ट्र राज्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.
( सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा. )
आजरा – प्रतिनिधी

शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेक्युलर मुव्हमेंट महाराष्ट्र राज्य, व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दि. 20/01/2026 रोजी हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, “शांततापूर्ण आंदोलनावर दडपशाही! हा अन्याय आम्ही सहन करणार नाही! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात हलविण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून लोकशाही मूल्यांवर आघात करणारी आहे.”
चौकट.
सोनम वांगचुक यांच्या प्रमुख मागण्या:
- NEET व इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
- या प्रकरणात सुमारे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
- परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आवश्यक सुधारणा तातडीने कराव्यात.
- लडाखच्या जनतेला संविधानिक आणि लोकशाही संरक्षण मिळावे.
- लडाखला अधिक घटनात्मक संरक्षण – सहाव्या अनुसूचीसारखे किंवा तत्सम संरक्षण द्यावे.
- स्थानिक नागरिकांना अधिक लोकशाही अधिकार व स्वायत्त शासनव्यवस्था मिळावी.
- लडाखची संस्कृती, पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण सुनिश्चित करावे.
- केंद्र सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी.
सेक्युलर मुव्हमेंटच्या वतीने मागणी करण्यात आली की, सरकारने सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या रास्त मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी आणि शांततापूर्ण आंदोलनावर कोणत्याही प्रकारची दडपशाही थांबवावी.
“लोकशाही वाचवा – शिक्षण व पर्यावरण वाचवा – लडाखला अधिक घटनात्मक संरक्षण द्यावे” अशी घोषणाही यावेळी देण्यात आली.
शासनाने सहकार्य न केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू असा इशारा सेक्युलर मुव्हमेंट महाराष्ट्र – आजरा, गडहिंग्लज, चंदगड यांच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर सेक्युलर मुव्हमेंटचे पदाधिकारी अजय देशमुख, दत्तात्रय कांबळे, सागर कांबळे, संदीप कांबळे राजेंद्र कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष मासोळी सह कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.
🛑 हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
( 💥सैनिक, माजी सैनिक वेलफेअर फाउंडेशन आजरा यांचे तहसीलदार यांना निवेदन. )
आजरा – प्रतिनिधी

हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपींवर कायद्यानुसार कडक व कठोर कारवाई करून शिक्षा करण्यात यावी, अशायाचे निवेदन सैनिक, माजी सैनिक वेलफेअर फाउंडेशन, आजरा यांच्या वतीने तहसीलदार आजरा यांना देण्यात आले.
फाउंडेशनचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलीकडील काळात हुंड्याच्या मागणीसाठी विवाहित महिलांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा त्यांचा संशयास्पद मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा अमानुष घटना समाजाला काळिमा फासणाऱ्या असून महिला सुरक्षा व न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत.
प्रकरण काय आहे?
आजरा तालुक्यातील सायबर चौक, राजारामपुरी येथील विवाहित मुलगी अस्मिता प्रतीकसिंह काटकर मूळ गाव लातगाव. ता. आजरा लग्नापूर्वीचे नाव अस्मिता अजित सरदेसाई. हिचा हुंड्याच्या कारणावरून सातत्याने छळ करण्यात आला. या छळामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. अशी घटना ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजासाठी अत्यंत वेदनादायी व निषेधार्ह आहे.
चौकट.
💥निवेदनातील फाउंडेशनच्या प्रमुख मागण्या.

- सदर प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व जलद चौकशी करण्यात यावी.
- मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
- भारतीय न्याय संहिता
BNSव इतर संबंधित कायद्यानुसार दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्यात यावा. - पीडित कुटुंबास शासनाच्या नियमानुसार सर्व प्रकारची मदत व संरक्षण उपलब्ध करून द्यावे.
- भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.
फाउंडेशनने प्रशासनाला विनंती केली आहे की, कोणत्याही आरोपीस राजकीय, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळू नये याची दक्षता घ्यावी. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई झाल्यास समाजात कायद्याबद्दल विश्वास निर्माण होईल आणि भविष्यात अशा अमानुष घटनांना आळा बसण्यास मदत होईल. सदर निवेदनावर अध्यक्ष दत्तात्रय मोहिते, सचिव दत्तात्रय सावंत, कृष्णा पाटील, सुरेश हसबे, राजाराम कुंभार, राजेंद्र सावंत, शंकर पाटील सह सर्व सदस्य यांच्या सह्या आहेत.




