आजरा. प्रतिनिधी.
आजरा पोलिसांच्या तपासात
कर्नाटक, गडहिंग्लज परिसरातून दुचाकी चोरलेल्या चोरट्यांना आजरा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सात दुचाकी गाड्या जप्त केलेल्या सुमारे तीन लाख गाड्यांची किंमत आहे. प्रवीण मारुती चौगुले वय ३६.,मनोज आनंदा देवेकर वय२७ रा. कोवाडे ता. आजरा अशा संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला असल्याचे. स. पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले प्रवीण चौगुले एक सहकारी संस्थेत कामाला होता.
कोरोणाच्या काळात त्यांनी नोकरी सोडली त्यानंतर त्यांनी दुचाकी चोरण्यास सुरुवात केली दीड वर्षात त्यांनी गडहिंग्लज, निपाणी, यमकनमर्डी, संकेश्वर, येथून गाड्या चोरल्या आहेत. अधिक तर गाड्या कर्नाटकातून लंपास केले आहेत आठवड्यापूर्वी भादवण ता. आजरा येथील एक युवक चोरीची गाडी वापरत असल्याची खबर मिळाली तपासात चौगुले व देवळेकर यांची नावे पुढे आली या चौगुले हा दुचाकी चोरटा आहे. तो त्याचा मित्र देवेकर त्यांच्याकडून गाड्या
विकले आहेत. त्याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, व सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज जाधव, नाईक आनंदा नाईक विशाल कांबळे प्रशांत पाटील संतोष घरातील, संतोष म्हसवेकर आणि अमर अडसुळे,यांनी तपास केला.
