Homeकोंकण - ठाणेतिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. - पालकमंत्री सतेज...

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. – पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील.

कोल्हापुर. प्रतिनिधी.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. तसेच, दुसऱ्या लाटेत केलेल्या कामाबाबत आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारी याबाबत सविस्तर आढावा घेतला.

यावेळी, जिल्हा प्रशासनाला खालील सूचना देण्यात आल्या आहेत.
१. येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे समजते. त्या दृष्टीने आत्तापासून ही संभाव्य लाट थोपविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे.

२. आरोग्य विभागाने दुसऱ्या लाटेचे अचुक विश्लेषण करावे. जेणेकरुन तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी याचा उपयोग होवू शकेल. तसेच, हॉस्पिटलचे बेड मॅनेटमेंट (खाट व्यवस्थापन) तात्काळ आणि सहजरित्या करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विशेष प्रणाली राबवावी.

३. कोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी पूर्णत्वाकडे जात असल्याने ऑक्सीजनबाबत कोल्हापूर जिल्हा लवकरच स्वंयपूर्ण होणार आहे. याचसोबत, चंदगड आणि गारगोटीला ऑक्सीजन प्लॅन्ट तयार करण्याचे नियोजन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

४. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून खाजगी रुग्णालयांसोबत सुद्धा समन्वय ठेवण्याच्या सूचना यावेळी केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.