Homeकोंकण - ठाणेकर्मचाऱ्यांना एकत्र करून जुनी पेन्शनचा लढा तीव्र करणार- सर्जेराव सुतार विस्वस्त.- महाराष्ट्र...

कर्मचाऱ्यांना एकत्र करून जुनी पेन्शनचा लढा तीव्र करणार- सर्जेराव सुतार विस्वस्त.- महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

पुणे. प्रतिनिधी. ३०

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ची सहविचार सभा जि.प. कर्मचारी सोसायटीच्या हॉल मध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करत संपन्न झाली. यावेळी संघटन चे विस्वस्त सर्जेराव सुतार प्रास्ताविक मध्ये बोलताना म्हणाले की जुनी पेन्शन ची मागणी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना एकत्र करून पेन्शन लढा तीव्र करणार. यासाठी सर्व विभागातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी यांनी संघटन च्या जुनी पेन्शन च्या लढ्यात सक्रिय व्हावे.

  संघटनेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष संदीप पाडळकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन हे जुनी पेन्शन लढ्याचे अधिकृत व्यासपीठ असून जिल्ह्यातील सभासदांनी या संघटन सोबत राहून संघटनची ताकद वाढवावी.संघटनेचे काम तालुक्यातील सामान्य शिलेदारांपर्यंत पोचविण्यासाठी तालुका प्रमुख तसेच जिल्हा पदाधिकारी यांनी योग्य नियोजन करावे.

फॅमिली पेन्शन, ग्रॅच्युयटी यासाठी संघटन राज्याध्यक्ष शिवराम घोती यांच्या नेतृत्वाखाली राज्य पातळीवर मंत्रालय स्तरावर भेटी देत आहे. असे तुषार पाटील यांनी सांगितले.

यावेळी स्वागत पुणे विभागाचे अध्यक्ष तुषार पाटील यांनी केले.
संतोष गायकवाड, विजय रामाने, संदीप कांबळे, क्रांती सावंत,शंकर शर्मा, मच्छिंद्र थोरबोले ,अमोल पाटील, आनंद कांबळे ,विकास चौगुले,राजेंद्र गंधवाले ,नबीसो नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केली. या सहविचार सभेस बाळाराम नाईक, राहुल जाधव,राहुल मोमले, संजय कांबळे, राघवेंद्र यडपलवार, संजय देसाई, भागवत शिंदे, जे डी शिंदे, एन ए घोंगडे, अभिजित काकडे, वैजनाथ शिवनगेकर,नित्यानंद हुद्दार आदी पदाधिकारी उपस्थित होते. आभार विकास चौगुले यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.