Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रयुवा उद्योजक सिकंदर आप्पालाल पठाण यांचे दुःखद निधन.

युवा उद्योजक सिकंदर आप्पालाल पठाण यांचे दुःखद निधन.

युवा उद्योजक सिकंदर आप्पालाल पठाण यांचे दुःखद निधन.


आजरा | प्रतिनिधी.


खेडे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी, स्व. आप्पालाल पठाण यांचे चिरंजीव, नीता ट्रॅव्हल्सचे मालक तसेच स्व. वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. रशिद पठाण यांचे पुतणे युवा उद्योजक सिकंदर आप्पालाल पठाण यांचे आज दुःखद निधन झाले.
दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.
पठाण कुटुंब पंचगंगा हॉटेल व नीता ट्रॅव्हल्स या व्यवसायासाठी परिचित आहे. आजरा येथेही त्यांचे वास्तव्य असून सण-उत्सवाच्या काळात त्यांचा आजरा परिसराशी जिव्हाळ्याचा संबंध होता. सिकंदर पठाण हे मनमिळाऊ, हसतमुख, सुस्वभावी व होतकरू युवा उद्योजक म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, चुलते व आप्तस्वकीय असा परिवार आहे.


अंत्यविधी
दिनांक: शनिवार, १८ जुलै २०२६
वेळ: सकाळी ११:०० वाजता
ठिकाण: आजरा
पठाण कुटुंबावर ओढवलेल्या या अपरिमित दुःखात आम्ही मनःपूर्वक सहभागी आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.