लाटगावच्या अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी आजरा ता. वासियांचा संताप.
( फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्या – ग्रामस्थांची मागणी.)
आजरा.- प्रतिनिधी.
लाटगाव ता. आजरा येथील लाटगाव गावातील अस्मिता प्रतीकसिंह काटकर हिचा १२ जुलै २०२६ रोजी सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून संशयास्पद मृत्यू झाला असले बाबत . आजरा तालुका ग्रामस्थ यांच्या व लाटगांव ग्रामस्थ यांच्यावतीने आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अस्मिताचे माहेरचे नाव अस्मिता अजित सरदेसाई आहे. हुंड्यासाठी पती प्रतीक काटकर, सासू-सासरे व नणंद यांनी वर्षभर तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. सततची मारहाण आणि अपमानास्पद वागणुकीमुळे तिने आपल्या माहेरच्यांकडे वारंवार तक्रार केली होती.
हा खटला महाराष्ट्रात चर्चेत आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मागणी सर्व ग्रामस्थ लाटगाव यांनी केली आहे.
पालकमंत्री कोल्हापूर, जिल्हाधिकारी कोल्हापूर, उपविभागीय अधिकारी भुदरगड यांना देण्यात आले आहे. तसेच महिला व बालविकास मंत्री आणि महिला आयोगाकडेही प्रत पाठवली आहे.
न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तातडीने कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, सरपंच संघटनेचे राजू पोतणीस, संभाजी सरदेसाई, तसेच डॉ. धनाजी राणे, डॉ. सौ स्मिता कुंभार ( परळकर) , यांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी व सौ अस्मिता काटकर हिला न्याय द्यावा. अशी मागणी केली.
यावेळी लाटगाव सरपंच वामन सुतार, उपसरपंच संदेश दळवी, रणजीत सरदेसाई, सी.डी. सरदेसाई सुधीर सुपल, भिकाजी हारुटे, दत्तात्रय मोहिते, रवींद्र तळेवाडीकर, बापू निऊगरे, अनिरुद्ध केसरकर, संतोष चौगुले, सिद्धार्थ तेजम, विजय थोरवत, उदय सरदेसाई, दत्तात्रय मोहिते, धोंडीबा देसाई, बाळू यादव, उदय चव्हाण, महेश पाटील, गौरव देशपांडे, सौ. यशोदा पोवार, रचना होलम, ज्योत्स्ना चराटी मनीषा देसाई, भारती डेळेकर, सविता जाधव, राजश्री सुपल, वर्षा यमगेकर, शशिकला देसाई, रूपाली गंभीर मंगल देसाई, सह आजरा तालुक्यातील विविध पक्षाचे, व संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




