राज्यात पावसाचा जोर वाढणार, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुंबई: – प्रतिनिधी
राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
यलो अलर्ट: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे. कोकणातही पाऊस पडणार
आज पावसाची अधिक शक्यता
- मध्य महाराष्ट्र : सातारा, सोलापूर
- *मराठवाडा*: धाराशिव, लातूर, नांदेड
- विदर्भ : वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
या ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- पुढील 2-3 दिवस: राज्यात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज.
- शेतकऱ्यांची चिंता: जूनमध्ये पावसाने ओढ दिली. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस नाही. पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट.
- पावसाची तूट: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच भागात जुलैच्या सरासरीपेक्षा 20 ते 60 टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे निम्मा महाराष्ट्र दुष्काळसदृश स्थितीत आहे.
- पुढील 3 दिवस: वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. शुक्रवारपासून विदर्भात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या सरींचा अंदाज.




