Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रकुणबी दाखले तातडीने देण्याची मागणी.- अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

कुणबी दाखले तातडीने देण्याची मागणी.- अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

कुणबी दाखले तातडीने देण्याची मागणी.- अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

आजरा – प्रतिनिधी.

अखिल भारतीय मराठा महासंघ, आजरा तालुक्याच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कुणबी जातीचे दाखले तातडीने देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर पडताळणी करून सापडलेल्या कुणबी नोंदी शासनाकडे सादर केल्या आहेत. मात्र, नोंदी उपलब्ध असूनही अनेक पात्र नागरिकांना अद्याप कुणबी दाखले मिळालेले नाहीत.
शासनाच्या अभिलेखांमध्ये उपलब्ध असलेल्या नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना तातडीने कुणबी दाखले देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी उपलब्ध असून आजरा तालुक्यातही अनेक नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे संबंधितांना लवकरात लवकर दाखले देऊन शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाची प्रत तहसीलदार, आजरा यांनाही देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, ता. अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, सह पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.