Homeकोंकण - ठाणेअभिवादन सभेत अनेकांनी. -डॉ गेल ओमव्हेट यांना वाहिली श्रध्दांजली.

अभिवादन सभेत अनेकांनी. -डॉ गेल ओमव्हेट यांना वाहिली श्रध्दांजली.

आजरा. प्रतिनिधी. ३०

आजरा येथे डॉ गेल ओमव्हेट यांना श्रध्दांजली वाहण्यात आली
गेल या महाराष्ट्र भूषणच्या पलीकडे गेलेल्या जागतिक दर्जाच्या विदुषी होत्या असे भावना आज येथे झालेल्या अभिवादन सभेत अनेकांनी बोलताना व्यक्त केल्या.
सभेच्या सुरवातीला डॉ गेल ओमव्हेट आणि नाटककार जयंत पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी गेल यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांना वारसा सांगितला. मुळात गेल अमेरिकेतून भारतात आल्या तो डेमोक्रॅटिक लेबर पार्टीचा वारसा घेऊनच. त्यांचे आजोबा ऑगस्ट ओमव्हेट चारवेळा राज्य प्रतिनिधी (आमदार-खासदार) मेंबर म्हणून तर दोन वेळा महापौर निवडले गेले होते. त्यामुळे श्रमिक मजूरांच्या मुक्तीवादी राजकारणाची एक परंपरा असल्याने फुले आंबेडकर हे त्यांच्या आस्थेचे विषय बनले. ज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या विचरविश्वात सत्यशोधक चळवळ, ब्राम्हणेत्तर चळवळ आणि आंबेडकरी तत्वज्ञान केंद्रस्थानी आणण्यात गेलच्या संशोधनाने महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. संशोधक आणि कार्यकर्ती अशा दुहेरी भूमिकेत वावरलेल्या गेल याना त्यांच्या ज्ञानसाधनेचा उपायोग करून चळवळी अधिक सक्षम करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
प्रा. राजा शिरगुप्पे म्हणाले की गेलचे आम्ही विद्यार्थी आहोत. तिने आम्हाला इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. जागतिक स्तरावरची संशोधक म्हणून तिला मान्यता असली तरी ती आमच्याशी अत्यंत मोकळेपणाने वागत आली. अहंकाराचा वारा न लागो जिवा हे ती सातत्याने जपत आली. भारतातल्या स्त्रीवादाला नवी दिशा देणारी गेल इथल्या अनेक चळवळीची मार्गदर्शक राहिली आहे. प्रा. डॉ नवनाथ शिंदे यांनी गेल ही खरया अर्थाने बुध्द बनलेली होती. प्रचंड संशोधन आणि अभ्यासाने तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना महात्मा फुले यांना जागतिक स्तरावर नेले.
यावेळी बी के कांबळे, राजाराम पोतनीस, संजय घाटगे, बजरंग पुंडपळ, शांताराम पाटील, गीता पोतदार, रणजित कालेकर, अशोक शिवणे, शिवाजी गुरव, भोसले सर यांनी आपल्या भाषणातून गेल यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी भीमराव पुंडपळ, नारायण राणे, प्रतिभा कांबळे, दशरथ घुरे, वंदन जाधव, प्रकाश मोरुस्कर, शिवाजी बापट, काशीनाथ मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. श्री हणमंतराव देसाई यांच्या हस्ते डॉ गेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरवात करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.