मडिलगे प्राथमिक आरोग्य उप. केंद्राची.- माझं गाव आरोग्य संपन्न गाव. अभियानाची बैठक.
आजरा.- प्रतिनिधी
माझं गाव आरोग्य संपन्न गाव या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सदर अभियान महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. मडिलगे तालुका आजरा येथील आरोग्य उपकेंद्रात या अभियानातील कमिटीची दि. ७ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी सरपंच बापू निऊगरे होते. स्वागत विद्या भोसले यांनी केले. प्रस्ताविक डॉ. अमोल चव्हाण यांनी केले यावेळी माहे जुलै मध्ये खालील उपक्रम राबवले जाणार असल्याने सदर विषयाबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये
१). महिलांसाठी तज्ञांचे आरोग्य शिबिर आयोजित करणे
२). लिंग आधारित हिंसाचार टाळण्यासाठी सामूहिक बैठक
३). कीटकजन्य आजार बाबत नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय योजना जनजागृती
४) जलजन्य आजार जनजागृती
५). घरातील कचऱ्याचे वर्गीकरण जनजागृती
६) जागतिक लोकसंख्या दिन निमित्त लोकसंख्या नियंत्रण समुपदेशन शिबिर अशा विविध विषयावरती चर्चा करून सदर अभियानात भाग घेऊन नाविन्यपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवण्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आले यावेळी बैठकीला गोविलकर सिस्टर, श्रीमती संगीता पाटील, सौ. वैशाली येसणे आशा स्वयंसेविका, शिक्षक प्रतिनिधी डॉ सामंत सर, स्थानिक पत्रकार संभाजी जाधव, महिला प्रतिनिधी सुप्रिया कातकर, मीनाक्षी कांबळे, सह सर्व समिती सदस्य उपस्थित होते. आभार सौ गोविलकर सिस्टर यांनी मानले.
