Homeकोंकण - ठाणेआजरा साखर कारखाना कामगार काॅलणीत वृक्ष पडून लाखोंचं नुकसान.

आजरा साखर कारखाना कामगार काॅलणीत वृक्ष पडून लाखोंचं नुकसान.

आजरा साखर कारखाना कामगार काॅलणीत वृक्ष पडून लाखोंचं नुकसान.

आजरा.- प्रतिनिधी

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना गवसे येथील कामगार काॅलणीतील बी टाईप बंगल्यावर मंगळवार दि. ७ रोजी सूरू असलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने उंबराचे वृक्ष उन्मळून पडले. तसेच या झाडामुळे ७ विद्धूत खांबही मोडून पडले व विज प्रवाह खंडीत झाला आहे. तसेच कारखाना परिसरात जोपासलेली अनेक झाडे धोकादायक दिसू लागलेने खबरदारीचा उपाय म्हणून कारखाना प्रशासनाने तात्काळ निर्णय घेवून उपाययोजना केल्या आहेत. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यामुळे फॅक्टरी बिल्डिंग वरील काही ठिकाणचे पत्रेही उडाले आहेत.
कारखाना परिसरात झालेल्या या आपत्तीची कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई व व्हाईस चेअरमन अनिल फडके यांनी पाहणी केली. या आपत्तीमुळे कारखान्याचे किमान पांच लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. या प्रसंगी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केले असलेचे कार्यकारी संचालक यांनी माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.