आजरा. प्रतिनिधी. ३०
आजरा जेऊर येथे दि. ३० रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विचारवंत गेल ऑम्व्हेट उर्फ शलाका पाटणकर शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज गौतम बुद्ध संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक यांचे दुखद निधन २५ ऑगस्ट २०२१ रोजी झाले. डॉ. भारत पाटणकर यांच्या दुखामध्ये आम्ही आजरा तालुक्यातील चित्री, उचंगी, सर्फनाला ,आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त सहभागी आहोत.
विशेषता सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या धरणग्रस्त चळवळीमध्ये गेल यांचा सातत्याने सहभाग राहिला होता. प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अनेक जुन्या आठवणीवर चर्चा झाली.कॉम्रेड संजय तर्डेकर म्हणाले सातासमुद्रापलीकडे वारकरी साहित्य व त्याच बरोबर सत्यशोधक महात्मा फुले , शाहू महाराज , कुलभूषण कुळवाडी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पोहचवण्यामध्ये कॉम्रेड गेल यांचा समभाग मोलाचा आहे. आमच्या सारख्या शाहू, फुले, आंबेडकर, मार्क्स कार्यकर्त्यांचे विध्यापीठ हरपले. याचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला झाले आहे. जाती अंताच्या लढाई मध्ये, स्त्री मुक्ती चळवळीमध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य राहिले आहे. आज झालेल्या शोकसभेमध्ये प्रकल्पग्रस्त पांडू धनुकटेकर यांनी प्रास्ताविक केले. या सभेमध्ये मारुती गुरव, कृष्णा गुडूळकर, बाळू पोवार,अशोक तर्डेकर, आनंदा नार्वेकर, निवृत्ती बापट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंच मारुती चव्हाण यांनी आभार मानून श्रद्धांजलीचा ठराव मांडला. या वेळी प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
