Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रचांदेवाडी - चोपडाई नजीक पट्टेरी वाघ.- कुत्रे केले लंपास. वन विभागाच्या विशेष...

चांदेवाडी – चोपडाई नजीक पट्टेरी वाघ.- कुत्रे केले लंपास. वन विभागाच्या विशेष सूचना.

चांदेवाडी – चोपडाई नजीक पट्टेरी वाघ.- कुत्रे केले लंपास. वन विभागाच्या विशेष सूचना.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील चांदेवाडी येथील चोपडाई नजीक शेतामध्ये बांधलेले कुत्रे पट्टेरी वाघांने घेऊन नेले असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी पाहणाऱ्या शेतकरी मजुरांनी पाहिले असल्याचे वन विभागाला याबाबत माहिती दिली आहे.
मालूबाई भुजंग हसबे , योगेश नाना गुजंकर यांची शेतातील घरातून बांधलेलं कुत्री पळवली असल्याचे समजते. याबाबतची आजरा वन विभागाचा विजय कोंडुस्कर यांनी माहिती दिली आहे.
वन विभागाला निवेदन.

याबाबत आजरा वन विभागाने तात्काळ महत्वाची सूचना देण्यात व आवाहन केले आहे

मौजे चांदेवाडी , ता. आजरा परिसरात बिबट वन्यप्राणी याचा वावर आढळून आला आहे. सर्व ग्रामस्थ, शेतकरी, महिला व लहान मुलांनी अत्यंत सतर्क राहावे.
कृपया खालील सूचना काटेकोरपणे पाळा : –
१)पहाटे व रात्री एकटे बाहेर जाणे टाळावे.
२)शेतात जाताना समूहाने जावे व टॉर्च सोबत ठेवावा.
३) लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये.
४ ) घराजवळ व गोठ्याजवळ प्रकाश व्यवस्था ठेवावी.
५) पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.
६) बिबट दिसल्यास आरडाओरडा, दगडफेक किंवा पाठलाग करू नये.
७)सुरक्षित अंतर राखून तात्काळ वन विभागास माहिती द्यावी.

सुचना

बिबट दिसल्यास त्वरित संपर्क करा :- टोल फ्री नं. : 1926
श्री. कृष्णा डेळेकर
परिमंडळ वनअधिकारी, उत्तर आजरा – 9764207982
श्रीमती प्रियांका पाटील
वनरक्षक, चंदगड
9404787105

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.