आजरा साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन उत्साहात, ( २०२६/२७ गळीत हंगामाची तयारी वेगात.)
आजरा.- प्रतिनिधी.
अमृतनगर – गवसे, आजरा येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. येथे सन २०२६/२७ च्या गळीत हंगामासाठी ओव्हर होलिंगचे काम गतीने सुरू झाले आहे. कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज दि. २ रोजी मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
४ लाख मे.टन ऊस गाळपाचे नियोजन.- यावेळी चेअरमन उदयसिंह देसाई यांनी सांगितले की, येत्या सन २०२६/२७ चा गळीत हंगाम ऑक्टोंबर २०२६ मध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने मशिनरी दुरुस्ती व देखभालीची कामे सुरू आहेत. कारखान्याने गळीत हंगाम २०२६/२७ करिता ७७०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद. पूर्ण केली असून, येत्या हंगामात ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी सर्व दुरुस्ती व देखभालीची कामे पूर्ण करून कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहे.
३८५ तोडणी-वाहतूक यंत्रणा सज्ज.-
येणाऱ्या गळीत हंगामासाठी परजिल्ह्यातील व स्थानिक मिळून ३८५ तोडणी-वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली असून, सदर यंत्रणेस पहिल्या ॲडव्हान्सची रक्कम वाटप करण्यात आली आहे. गळीत हंगामासाठी आवश्यक कामकाजाचे नियोजन व्यवस्थापनामार्फत केले जात आहे, अशी माहिती देण्यात आली. या रोलर पूजन सोहळ्याला व्हा. चेअरमन अनिल फडके, जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, उदयसिंह पोवार, मधुकर देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, रणजित देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, सौ. संचालिका रचना होलम, मनिषा देसाई, तसेच संचालक काशिनाथ तेली, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक एस. के. सावंत, जनरल मॅनेजर (टेक्नि ) एम. आर. पाटील, चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण, चिफ केमिस्ट सुजय पाटील, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई, सिव्हील इंजिनिअर शंकर आजगेकर, एच.आर. मॅनेजर सुभाष भादवणकर व इतर अधिकारी, युनियन अध्यक्ष, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




