आजरा : वन्य हत्ती प्रश्नी वन विभागाकडून चर्चेचे निमंत्रण.- ३ जुलै रोजी बैठक.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना वन्य हत्तींपासून होत असलेल्या त्रासाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख यांनी दिलेल्या निवेदनाची वन विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. वन विभागाकडून.
उपाययोजना.
वन विभागाने पत्राद्वारे कळवले आहे की, वन्य हत्ती प्रश्नावर खालील उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत:
१) हत्ती कॅम्प :- मौजे सुळेरान (धनगरमोळा) येथे हत्ती कॅम्प उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे.
२) ड्रोनद्वारे निगराणी.- ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने हत्ती बाधित क्षेत्रातील हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, हत्ती मानवी वस्तीत घुसू नयेत यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
३) रात्रीची गस्त:- हत्ती बाधित क्षेत्रात रात्री हत्ती हाकारा पथकामार्फत नियमित गस्त घातली जात आहे.
४) नुकसानभरपाई:- हत्तींमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे विहित कालावधीत पूर्ण करून नियमानुसार नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
५) जनजागृती :-
ग्रामस्थांना हत्तींच्या हालचालींबाबत वेळोवेळी सूचना देणे, जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबवल्या जात आहेत.
३ जुलै रोजी चर्चा बैठक.-
वन विभागाने शुक्रवार, दि.३ रोजी प्रस्तावित मोर्चा स्थगित करून चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. यासाठी शुक्रवार, दि.३ रोजी सकाळी ११ वा. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, आजरा येथे चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका प्रमुख व शिष्टमंडळाला करण्यात आले आहे.
वन विभागाने सर्व सूचना सकारात्मकपणे ऐकून शासनाच्या नियमानुसार कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे. लोकप्रतिनिधी, नागरिक व वन विभाग यांच्या समन्वयातून वन्य हत्ती प्रश्नावर प्रभावी उपाययोजना निश्चित करता येतील, असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सावंत आजरा यांचे वतीने बैठकिचे पत्र उबाठा सेनेच्या मागणी नुसार देण्यात आले आहे.




