Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; पहिल्याच दिवशी ९१ टक्के उद्दिष्टपूर्ती( लोकप्रतिनिधींच्या...

आजरा येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; पहिल्याच दिवशी ९१ टक्के उद्दिष्टपूर्ती( लोकप्रतिनिधींच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस; ५,०३३ बालकांचे लसीकरण )

आजरा येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; पहिल्याच दिवशी ९१ टक्के उद्दिष्टपूर्ती
( लोकप्रतिनिधींच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस; ५,०३३ बालकांचे लसीकरण )

आजरा, प्रतिनिधी.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आजरा येथे लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात शुभारंभ झाला. जि. प. सदस्य सुधीर देसाई, शिरिष देसाई, पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा पोवार, पं. स. सदस्य समीर पारधे, विकास चोथे तसेच नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओची मात्रा देऊन देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

मोहिमेची वैशिष्ट्ये.-

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी, मलिग्रे, भादवण व उत्तूर तसेच ग्रामीण रुग्णालय, आजरा यांच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. यासाठी तालुक्यात १०८ पोलिओ बूथ उभारण्यात आले होते. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी २६५ कर्मचारी व २४ सुपरवायझर कार्यरत होते.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच दिवशी ५,०३३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले असून ९१ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण पुढील चार दिवस घरभेटीद्वारे पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. या मोहिमेस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक तसेच लोकप्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

“प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब – निरोगी बालक, पोलिओमुक्त भारत!” हा संदेश देऊन मोहिमेचा समारोप करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.