आजरा-गडहिंग्लज रोडवर पिकअपच्या धडकेत एक ठार, एक जखमी.
( भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल.)
आजरा, प्रतिनिधी.
आजरा-गडहिंग्लज रोडवर म्हसोबा नजीकच्या वनविभाग कार्यालयाजवळ अज्ञात पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. दि. २६ जून २०२६ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
ज्ञानेश्वर लक्ष्मण भांदुर्गे, वय २९, रा. आल्याचीवाडी, ता. आजरा हे त्यांचा मित्र विलास गंगाराम पेडणेकर, वय ३२, रा. गवसे, ता. आजरा याच्यासह डिस्कव्हर मोटरसायकल क्र. MH09BY956 वरून. आल्याचीवाडी येथून गवसे मार्गे आजरा-गडहिंग्लज रोडने जात होते. म्हसोबा वनविभाग ऑफिसजवळ आले असता गडहिंग्लजकडून आजऱ्याकडे येणाऱ्या अज्ञात पिकअप गाडीच्या चालकाने भरधाव वेगाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर भांदुर्गे जखमी झाले, तर पाठीमागे बसलेले विलास गंगाराम पेडणेकर यांचा मृत्यू झाला. जखमी भांदुर्गे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे उपचार सुरू आहेत.
ज्ञानेश्वर भांदुर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलीस ठाण्यात गु. र. नं. १७०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटार वाहन अधिनियम १८४, १३४(अ), १३४(ब) प्रमाणे अज्ञात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपोनि यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ गवळी हे करीत आहेत.
