Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रडासांची पैदास रोखा, हिवतापाला आळा घाला" वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची जनजागृती मोहीम.

डासांची पैदास रोखा, हिवतापाला आळा घाला” वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची जनजागृती मोहीम.

डासांची पैदास रोखा, हिवतापाला आळा घाला” वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची जनजागृती मोहीम.

आजरा, प्रतिनिधी

आरोग्य विभागामार्फत १ जून ते ३० जून हा ‘हिवताप जनजागरण महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हिवताप प्रतिबंध व नियंत्रणासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात आली. “येता कणकण, तापाची करा तपासणी रक्ताची!” हा संदेश घेऊन आरोग्य पथकाने वाटंगी व परिसरातील गावांमध्ये घरभेटी केल्या. यावेळी कंटेनर सर्वेक्षण, डास उत्पत्ती स्थळांची तपासणी व आरोग्य शिक्षणाचे उपक्रम राबवण्यात आले. हिवतापाची लक्षणे, आजाराचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना व वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

चौकट.

आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन.

  • घरात व परिसरात साचलेले पाणी तात्काळ नष्ट करा
  • पाण्याच्या टाक्या, रांजण व इतर भांडी घट्ट झाकून ठेवा
  • घर व परिसर स्वच्छ ठेवा
  • रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा
  • आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ म्हणून सर्व पाणी साठे कोरडे करा
  • ताप, थंडी वाजून येणे, घाम येणे, डोकेदुखी किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात जाऊन मोफत रक्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

हिवताप हा संक्रमित मादी ॲनोफिलीस डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार आहे. वेळेवर निदान व योग्य उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळता येतात. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरित आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.

या मोहीमेत ता. आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. ए. शेख, आरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट, आरोग्य सहाय्यक जे. एच. साबखान, आरोग्य सहायिका रंजना गावडे तसेच आरोग्य सेवक युनुस सय्यद, दर्शन भालेराव, दिपक हरणे, लक्ष्मण घोरपडे व रोहित शेंडे यांनी सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.