पावसाचा अंदाज – जून महिन्याच्या अखेरीस मान्सून राज्यात
मुंबईः- प्रतिनिधी.
काही दिवसांपासून मान्सूनने ब्रेक घेतला होता, मात्र आता जून महिन्याच्या अखेरीस मान्सून राज्यात ठिकठिकाणच्या भागांत पुन्हा सक्रिय झालेला दिसून येत आहे. राज्यातील मुंबईसह काही भागांत मंगळवारी पावसाने हजेरी लावली. संपूर्ण मराठवाडा छायेखाली असून 24 तासांत आणखी काही भागांत पावसाचा अधिकचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कोकण विभागात 24 तासांत पावसाची अधिकची तीव्रता वाढणार आहे. पालघर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मान्सूनची शक्यता आहे. यामुळे सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसासह अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मान्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाडा विभागात मान्सूनने आगमन केले असून काही भागांत पावसाची हजेरी लागण्याची अधिकची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
आहे. दरम्यान, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती दिसून येईल. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिकच्या घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. याच जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज जारी केला आहे. विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी उष्णता कामय राहणार आहे.
अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांत हिट वेव्हचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अमरावती जिल्ह्यांत हिट वेव्हचा अधिक प्रभाव जाणवेल. भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत




