Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा.

आजरा शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा.

आजरा शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा.

आजरा.- प्रतिनिधी.

शिवसेना ( शिंदे ) आजरा सेनेच्या वतीने ६० वा वर्धापन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी सातत्याने लढण्याची आणि रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करण्याची शिकवण शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पक्षाला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आजच्या या शुभ दिनी शिवसेना आजरा येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सामाजिक भान जपत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे रुग्णांना फळांचे वाटप केले. तसेच नव्याने होत असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयच्या इमारतीच्या कामाला भेट देऊन आढावा घेतला. येणाऱ्या काळात पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून पक्ष संघटना मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी आजरा संपर्क प्रमुख जितेंद्र भोसले, शिवसेना, उप तालुका प्रमुख काकासो देसाई, युवासेना तालुका प्रमुख मंदार बिरजे, रणजित सरदेसाई, संतोष भाटले, सुनील दिवेकर,.इंद्रजित देसाई, धनंजय पाटील, नगरसेवक महेश खेडेकर, विशेष कार्यकारी अधिकार आमजद मानगावकर तसेच ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. अमोल पाटील व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. शहर प्रमुख विजय थोरवत यांनी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील सर्व नेते, पदाधिकारी, शिवसैनिक यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.