Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा ते आवंडी पैकी धनगरवाडा क्रं. ३ पर्यन्त एस. टी. सेवा सुरु...

आजरा ते आवंडी पैकी धनगरवाडा क्रं. ३ पर्यन्त एस. टी. सेवा सुरु करावी.- आजरा आगाराला निवेदन. ( स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस सेवा सुरू होईल. )

आजरा ते आवंडी पैकी धनगरवाडा क्रं. ३ पर्यन्त एस. टी. सेवा सुरु करावी.- आजरा आगाराला निवेदन. ( स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस सेवा सुरू होईल. )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आगार प्रमुखांना
आजरा ( शिंदे शिवसेना पक्षाच्या ) वतीने आजरा आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे आजरा तालुक्यातील आवंडी पैकी धनगरवाडा क्रं. ३ पर्यन्त एस. टी सेवा सुरू करावी.
आजरा येथून आवंडी पैकी धनगरवाडा क्रं १ पर्यंत आपले आगारातून २ वर्ष झाले नियमित शाळेच्या विध्यार्थीसाठी बस सेवा सुरु आहे. पण धनगर वाडा क्रमांक दोन असेल किंवा धनगरवाडा क्रमांक तीन असेल येथील विद्यार्थ्यांना सातत्याने जवळपास साडेचार किलोमीटर अंतर पायपीट करावी लागते. तसेच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वन्य प्राणी अतिवृष्टी यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो यापूर्वी देखील वारंवार आपल्या आगाराकडे येथील ग्रामस्थांनी एसटी सेवेची मागणी करून देखील आज तागायत त्याची दखल घेतली गेली नाही. ही बस सेवा सुरू झाल्यानंतर

स्वातंत्र्यानंतर प्रथमच येथे बस सेवा सुरू होणार आहे.

तरी त्याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तात्काळ बस सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावा. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर ता. प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख विजय थोरवत, कार्यालय प्रमुख संतोष भाटले, तसेच इंद्रजीत देसाई, महेश दळवी, सुनील दिवेकर, दयानंद निऊगरे सह धनगर वाड्यावरील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.