ग्रामीण रुग्णालय आजरा.- आढावा बैठकीत तक्रारींचे निरसन.- आजरा शिवसेना उबाठा पक्षाच्या पुढाकाराने बैठक.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे दि १७ रोजी शिवसेना उबाठा व नागरिकांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बाबत विविध योजना, कोणकोणते आजारावरती उपचार केले जातात, कर्मचारी वर्ग किती आहे किती कमी आहेत. कर्मचारी व डॉक्टर कमी असल्यामुळे काय समस्या उद्भभवतात याबाबतची आढावा बैठक शिवसेना उबाठा वतीने आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये नागरिकांना विविध शंकेचे निरसन व काही नागरिकांना ग्रामीण रुग्णालय मध्ये आलेले अनुभव यानुसार नागरिकांना आपण व्यवस्थित सेवा द्यावी. यासाठी उपस्थित डॉक्टर ब्रदर, सिस्टर, यांच्या कामाची वेळ, रुग्णालयात आलेल्या लाभार्थ्यांना लाभ, स्वच्छता, नव्याने होत. असलेले ५० बेड हॉस्पिटल, कधी पूर्ण होणार व, ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असलेले नागरिक यांना उपचार व वागणूक व्यवस्थित मिळाली.
अशा मागण्या उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील ता. प्रमुख युवराज पोवार यांनी
वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल पाटील यांच्याकडे केल्या.
याबाबत शासनाच्या येत असलेल्या योजना या लाभार्थी नागरिकांच्याकडे व्यवस्थित पणे पोहोचवून नागरिकांना चांगल्या वागणुकीत उपचार व सेवांबाबत न्याय मिळावा. अशा विविध चर्चा करण्यात आल्या. जि. प. सदस्य सुधीर देसाई यांनी या चर्चेत सहभाग घेऊन ग्रामीण रुग्णालयाची माहिती, नागरिकांच्या वरती, कोण कोणते उपचार केले जातात. याबाबतच्या माहिती व सूचना देऊन माहिती घेतली.
मागील एक वर्षात रुग्णालयाच्या कामकाजात व उपचार देणे संदर्भात काही आलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्री पाटील यांनी समाधानकारक माहिती दिली.
व काही त्रुटी नकळत झालेल्या चुका याबाबत सर्व कर्मचारी यांना सूचना केल्या.
यावेळी डॉ. सुरजित पांडव, ऊर्जादेवी पाटील, ब्रदर भूषण इंगवले, संतोष पाटील, दयानंद उपासे, विक्रम गंधाडे, सोपान बुद्धवंत शिवसेना पदाधिकारी उप.ता. प्रमुख शिवाजी आढाव, शहर प्रमुख समीर चांद, दिनेश कांबळे, रवी जाधव, सुजल पाटील, शिवाजी इंगळे, सुरेश शिवणे, तसेच काशिनाथ मोरे सह ग्रामीण रुग्णालय स्टाफ, पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट.
ग्रामीण रुग्णालय आजरा आढावा व अडचणी अहवालात दिलेली माहिती.
सन. २०२५ / २६ माहे एप्रिल २०२६ ते आज अखेर
आढावा तपशील.
२) बाह्य रुग्ण विभाग ( ओपीडी ) रुग्णालयात तपासणी केलेले रुग्ण संख्या.- ५२ हजार ४२ , / ७ हजार ८८४,
२) आंतररुग्ण विभाग (आयपीडी ) दाखल करून उपचार केलेल्या रोगांची संख्या.- ६००
३) प्रसुती नैसर्गिक २९ व ०६ व सिझर ५५/ ०५ शासकीय विविध योजनेची अंमलबजावणी यामधील आकडेवारी ६०/ २६ अशा विविध योजनेची लाभार्थ्यांना व नागरिकांना दिलेल्या लाभाची आकडेवारी ग्रामीण रुग्णालय आजरा अधीक्षक श्री पाटील यांनी दिली.
अधीक्षक डॉ. अमोल पाटील.
यांच्या नागरिकांना सूचना व आवाहन.
१) रुग्णवाहिकेसाठी १०२ वर कॉल करावा.
२) शासनाच्या विविध योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
💥रुग्णालयात मंजूर पदे आणि सध्या भरलेली पदे यातील तफावत.उदा.- स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ किंवा परिचारिकाची पदे रिक्त असणे.
यामुळे रुग्णांना वेळत उपचार मिळण्यात अडचणी येतात किंवा जिल्हा रुग्णालयात संदर्भित ( रेफर ) करावे लागते.
लवकरच ५० बेडच्या इमारतीचे काम पूर्ण होईल.
सद्यस्थितीत पायाभूत सुविधा व इमारत दुरुस्ती काम आहे.
