Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशासकीय आदेशाचा अवमान कंरून अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी.- मौजे कासारकडगाव...

शासकीय आदेशाचा अवमान कंरून अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी.- मौजे कासारकडगाव ग्रामस्थांचे निवेदन.( 💥टोलबाबत टोलवाटोलवी. )🛑आजरा टोलनाक्याच्या बाबतीत टोल विरोधी कृती समितीच्या काही सदस्यांची दुटप्पी भूमिका.- शिंदे सेना आजरा.

🟣 शासकीय आदेशाचा अवमान कंरून अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी.- मौजे कासारकडगाव ग्रामस्थांचे निवेदन.
( 💥टोलबाबत टोलवाटोलवी. )
🛑आजरा टोलनाक्याच्या बाबतीत टोल विरोधी कृती समितीच्या काही सदस्यांची दुटप्पी भूमिका.- शिंदे सेना आजरा.

🟣 शासकीय आदेशाचा अवमान कंरून अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी.- मौजे कासारकडगाव ग्रामस्थांचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

मौजे कासारकडगाव ता. आजरा येथील गट नंबर २९३ (सरकार हक्क इनाम जमीन) या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण रोखण्याबाबत आणि कायदा व सुव्यवस्थेंचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत कासारकाडगांव ग्रामस्थांची आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे कासारकडगाव ता. आजरा येथील
१) जमिनीची सद्यस्थिती मौजे कासारकडगाव येथील गट नंबर २९३ ही जमीन ‘सरकार हक्क इनाम जमीन’ म्हणून नोंदलेली आहे. सदर जमिनीच्या बाबतीत प्रांत अधिकारी, मा. जिल्हाधिकारी व मा. पुणे आयुक्त यांच्या आदेशानुसार सध्या ‘जैसे थे’ (Status Quo) परिस्थिती ठेवण्याचे आदेश लागू आहेत.
२) अतिक्रमणाचा प्रयत्नः असे असतानाही, सध्या या शासकीय व वादग्रस्त जमिनीवर बेकायदेशीरपणे कृष्णा मारुती गुरव व त्यांचे कुटुंब यांच्याकडून ताबा घेण्याचा आणि अतिक्रमण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मा. न्यायालयाच्या/आयुक्तांच्या ‘जैसे थे’ आदेशाचे हे थेट उल्लंघन आहे.
३) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नः ही जमीन शासकीय हक्काची असल्याने आणि त्यावर संपूर्ण गावाचे हित अवलंबून असल्याने, सदर व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाकडून होत असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे गावातील जनतेमध्ये तीव्र असंतोष
पसरला आहे. जर हे अतिक्रमण तात्काळ थांबवले नाही, तर गावात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ( Law and Order) निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तरी मा. आयुक्त, पुणे यांच्या ‘जैसे थे’ आदेशाचा आदर राखून, मौजे कासारकडगाव येथील गट नंबर २९३ वर कृष्णा मारुती गुरव व त्यांच्या कुटुंबाकडून होणारे बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ थांबवण्यात यावे. तसेच, शासकीय जमिनीचे रक्षण करून गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल व पोलीस प्रशासनामार्फत तात्काळ योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. शासकीय आदेशाचा अवमान कंरून अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी. हीच समस्त ग्रामस्थांची विनंती. असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जयसिंग निरटेकर, अशोक कांबळे, विनायक सरदेसाई, सचिन पारके, मसू डेळेकर, सुरेश गावडे, इक्बाल आगा, प्रकाश मनगुतकर सह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

( टोलबाबत टोलवाटोलवी. )
🛑आजरा टोलनाक्याच्या बाबतीत टोल विरोधी कृती समितीच्या काही सदस्यांची दुटप्पी भूमिका.- शिंदे सेना आजरा.

आजरा – प्रतिनिधी.

आजरा येथील संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांची चाललेली टोलवाटोलवी याबाबत आठ दिवसांपूर्वी पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आजरा शहरात नजीक असलेला टोल नाका स्थलांतरित करावा. अशी मागणी केली होती. याबाबत टोल विरोधी कृती समितीच्या काही पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावरून शिंदे शिवसेना यांनी आपली टोलबाबत भुमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषेद बोलवण्यात आली होती. यावेळी १) मुळात टोल हटावो हि भुमिका नाम. आबिटकर यांची आहे.
२) टोल विरोधी कृती समितीची स्थापना हि सर्व पक्षीय असताना या समिती मधील काही सदस्य यांनी परस्पर तहसीलदार कार्यालयात बैठकीत टोल सुरू करण्याची परवानगी दिली. व कोणालाही विश्वासात न घेता काही सदस्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दिलेल्या माहितीमध्ये दुटप्पी व भिन्नता वाटते.‌ ३) पालकमंत्री नाम. श्री. आबिटकर यांची केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या सोबत झालेली टोल स्थलांतर हि चर्चा सकारात्मक होती. अशी स्पष्ट भूमिका शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी ता. प्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख विजय थोरवत, तसेच इंद्रजीत देसाई, संतोष भाटले, दयानंद निऊगरे, नितिन यादव, सुनील देवेकर सह पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.