Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र रामतीर्थ पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न.

रामतीर्थ पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न.

रामतीर्थ पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी

आजरा वनविभाग, आजरा ता. सरपंच संघटना, मराठा महासंघ आजरा, आजी – माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १६ रोजी रामतीर्थ पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेअंतर्गत रामतीर्थ फाटा ते रामतीर्थ पर्यटन स्थळादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांच्या फांद्या व झुडपे साफ करण्यात आली. तसेच परिसरातील प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या व इतर टाकाऊ कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित करण्यात मदत झाली.
या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आजरा तालुक्यातील सरपंच, सरपंच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच आजी – माजी सैनिक संघटना आजरा चे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पर्यटन स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखणे, पर्यावरण संवर्धन करणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने सदर मोहीम राबविण्यात आली. उपस्थितांनी पर्यटन स्थळ परिसर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
सर्व संबंधितांच्या सक्रिय सहभागामुळे ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पडली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.