Homeकोंकण - ठाणेआजरा पं.स. सभापती सौ. जयश्री गाडेंचा यांचा कुणबी दाखला अवैध.

आजरा पं.स. सभापती सौ. जयश्री गाडेंचा यांचा कुणबी दाखला अवैध.

आजरा पं.स. सभापती सौ. जयश्री गाडेंचा यांचा कुणबी दाखला अवैध.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री संजय गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला आहे.
जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीन सौ. गाडे यांचा दाखला अवैध ठरवला आहे. याबाबत ५ मे रोजी सुनावनी झाली होती. आज जिल्हा जाती प्रमाणपत्र समितीने याबाबतचा निकाल दिला.
सदर तक्रार पंचायत समिती निवडणुकीतील पराभूत उमेदवार सौ. साधना संजय केसरकर यांनी सभापती जयश्री गाडे यांच्या दाखल्यावर हरकत घेत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. यावर ५ सुनावण्या झाल्या असल्याची समजते. आज दि. ११ रोजी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने सभापती सौ. गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध ठरविला. पंचायत समितीच्या भादवण गणात आरक्षणात महिला ओबीसीचे आरक्षण सभापती पदासाठी जाहीर झाले होते. भादवण पंचायत समिती गणातून सौ. गाडे या राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडून आल्या असून. ताराराणी आघाडीच्या उमेदवार साधना संजय केसरकर यांनी कोल्हापूर जात पडताळणी कार्यालयात गाडे यांच्या कुणबी दाखल्याबाबत तक्रार दाखल केली होती. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्राव्याअभावी सभापती सौ गाडे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. गाडे यांनी सादर केलेली कागदपत्रे त्यांचा कुणबी (इतर मागासवर्ग) जातीचा दावा सिद्ध झाला नाही.

सौ. गाडे यांना उच्च न्यायालय मुंबई यांच्या सर्किट बेंच कोल्हापूर येथे दाद मागता येणार आहे. २२६ नूसार याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे दाद मागणार असल्याचे सभापती जयश्री गाडे यांना विचारणा केली असता सांगीतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.