Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमडिलगेत 'मैत्री फाउंडेशन'चे थाटात उद्घाटन.- सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक कार्यासाठी तरुणाई सरसावली‌- गणपतराव...

मडिलगेत ‘मैत्री फाउंडेशन’चे थाटात उद्घाटन.- सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक कार्यासाठी तरुणाई सरसावली‌- गणपतराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.

मडिलगेत ‘मैत्री फाउंडेशन’चे थाटात उद्घाटन.- सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक कार्यासाठी तरुणाई सरसावली‌- गणपतराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.

आजरा, प्रतिनिधी.

सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरण, कला, क्रीडा व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत विधायक काम करण्याच्या उद्देशाने मडिलगे येथे ‘मैत्री फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली असून या फाउंडेशनच्या बॅनरखाली गावातील तरुण पिढी एकवटली आहे.

दि. १० जून २०२६ जून रोजी श्री शंकरलिंग मंदिर येथे मैत्री फाउंडेशनचा स्थापना सोहळा व आरोग्य विषयक विविध साहित्याचे उद्घाटन हनुमान पतसंस्थेचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान संस्था समूहाचे प्रमुख के. व्ही. येसणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती भिकाजी गुरव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत सरपंच बापू निऊगरे यांनी केले.

यावेळी शिवाजी पारळे यांनी मैत्री फाउंडेशनचा ध्येय, ध्यास व उद्देश उपस्थितांसमोर स्पष्ट केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष के. व्ही. येसणे, भिकाजी गुरव, लोकमान्य संस्था समूहाचे अध्यक्ष जनार्दन निऊगरे, माजी सरपंच दीपक देसाई, शिवाजी गुरव यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चौकट : उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती.

या उद्घाटन सोहळ्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, मनसे तालुका अध्यक्ष आनंदा घंट्टे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मैत्री फाउंडेशनचे सदस्य अनिकेत कवळेकर, कुंडलिक डोंगरे, डॉ. बी. जी. पाटील, संभाजी आरळगुंडकर, युवराज येसणे, पांडुरंग जाधव, संदीप पाटील, संदीप येसणे यांच्यासह सर्व सदस्यांनी केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.