Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्र१५ जून, २०२६ या कालावधीतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण ( रेशन कार्ड वरील...

१५ जून, २०२६ या कालावधीतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण ( रेशन कार्ड वरील धान्य) दि.१५.०६.२०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. – शासन परिपत्र – धन्य वितरण कालावधी कमी- लाभार्थ्यांनी लवकर लाभ घ्यावा.- अधिक माहितीसाठी पहा.👇

१५ जून, २०२६ या कालावधीतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण ( रेशन कार्ड वरील धान्य) दि.१५.०६.२०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. – शासन परिपत्र – धन्य वितरण कालावधी कमी- लाभार्थ्यांनी लवकर लाभ घ्यावा.- अधिक माहितीसाठी पहा.👇

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार, माहे मे व जून, २०२६ या कालावधीतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण दि.१५.०६.२०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावे याबाबतचे शासन परिपत्र प्रसिद्ध केले आहे.
💥 परंतु मोठमोठ्या, शहरांमध्ये ,गावांमध्ये रेशन धारकांची संख्या अधिक आहे. यामध्ये थांब लावण्यासाठी सतत सर्वेर डाऊनची अडचण येत आहे. त्यामुळे दिवसभरात अंदाजे एका दुकानात ६० ते ७० रेशन कार्ड धान्य लाभार्थ्यांना धान्य वितरित करता येत. हि तारेवरची कसरत असताना शासनाने दिलेल्या मुदतीत धान्यसाठा सर्वेर डाऊन असल्यामुळे संपणे व सदर धान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचे मत लाभार्थी धारकांची आहे. अर्धा एक तास लाईन मध्ये उभारून एक एक वेळी २० मिनिटे थम लागत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये ई-पॉस मशिनद्वारे लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण पुर्ण करून काही स्वतःच्या वेळेनुसार धान्य उचलणारा रेशन कार्ड लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू शकतो.‌ दुसरीकडे शेतीच्या कामाची लगबग चालू आहे. दिवसभर ग्रामीण भागातील शेतकरी किंवा शहरातील नोकरी व्यवसायानिमित्त जाणारे लाभार्थी यांना दिवसभर रेशनचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे सदर कालावधी वाढवून मिळावा असा रेशन कार्ड लाभार्थी यांचे मत आहे.

🟣शासनाच्या परिपत्रात म्हटले आहे.

संदर्भ:- १) केंद्र शासनाचे दि.०२.०३.२०२६ चे पत्र.
२) शासनपत्र, समक्रमांक, दि.०९.०४.२०२६ रोजीचे पत्र.
३) केंद्र शासनाचे दि.२२.०५.२०२६ रोजीचे पत्र.
४) शासनपत्र, समक्रमांक, दि.२५.०५.२०२६ रोजीचे पत्र.
५) केंद्र शासनाचे दि.०४.०६.२०२६ रोजीचे पत्र.
💥केंद्र शासनाच्या दि.२२.०५.२०२६ रोजीच्या सूचनांनुसार, लाभार्थ्यांना माहे मे व जून, २०२६ चे अन्नधान्याचे वितरण दि.३१.०५.२०२६ पर्यंत पूर्ण करण्याबाबत संदर्भ क्र.०४ अन्वये सूचना देण्यात आल्या. त्यानुषंगाने माहे एप्रिल, मे व जून, २०२६ चे अन्नधान्य वितरणास मुदतवाढ देण्याबाबत केंद्र शासनास विनंती करण्यात आली असता, केंद्र शासनाने माहे मे व जून, २०२६ या महिन्यांचे अन्नधान्य वितरणास दि.१५.०६.२०२६ पर्यंत अंतीम मुदतवाढ दिली आहे.
💥केंद्र शासनाच्या सूचनांनुसार, माहे मे व जून, २०२६ या कालावधीतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण दि.१५.०६.२०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. तसेच केंद्र शासनाकडून माहे मे व जून, २०२६ च्या अन्नधान्य वितरणास दि.१५.०६.२०२६ नंतर मुदतवाढ मिळणार नसल्याने सदर कालावधीमध्ये ई-पॉस मशिनद्वारे लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण पुर्ण करून कोणताही लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, यांची दक्षता घेण्यात यावी, याबाबत चे परिपत्र
(प्रज्ञा फटे) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रत माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहीकरीताः- १. कक्ष अधिकारी, नापु-२२ व नापु-१६-अ, अनापु व ग्रासंवि.
२. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई/ठाणे
३. सर्व उपायुक्त (पुरवठा)
यांना सादर करण्यात आले आहे

तरी जिल्ह्यातील सर्व रेशन कार्डधारक लाभार्थ्यांनी आपले धान्य वेळेत उचल करून शासनाला देखील सहकार्य करावे. व शासनाने ही सदर धान्य वितरण करण्याची वेळ संघचालकांना वाढवून द्यावी अशी मागणी रेशन वितरण करणाऱ्या संघ चालकाकडून होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.